Wednesday, November 29, 2023
Homeचंद्रपूरचंद्रपुरात पोलिसांच्या वाहनाने सेवानिवृत्त पोलीस अधिकाऱ्याच्या मुलाचा मृत्यू

चंद्रपुरात पोलिसांच्या वाहनाने सेवानिवृत्त पोलीस अधिकाऱ्याच्या मुलाचा मृत्यू

चंद्रपुरात आठवडाभरात 7 जणांचा अपघातात मृत्यू

- Advertisement -
- Advertisement -

News34 chandrapur

चंद्रपूर : भरधाव वेगाने येणाऱ्या दुचाकीस्वाराने ट्रॅक्टरला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात विरुद्ध दिशेने येणाऱ्या पोलीस वाहनाला धडक दिली. यात युवक ठार झाल्याची घटना शुक्रवारी घडली. हा अपघात महानगरातील रहेमतनगर परिसरात घडला. प्रणील प्रमोद चिंचोळकर (२९) रा. नगिनाबाग चंद्रपूर असे मृतकाचे नाव आहे. चंद्रपूर शहरात आठवडाभरात 7 मृत्यू झाले आहे.

 

मिळालेल्या माहितीनुसार, प्रणील हा दुचाकी क्रमांक एमएच ३४/बीजे ७८२० या क्रमांकाच्या दुचाकीने बिनबा गेटकडून सिस्टरकॉलनीकडे येत होता. तर शहर पोलिसांचे वाहन क्रमांक एमएच ३४/६०६६ हे सिस्टरकॉलनीकडून बिनबागेटमार्गे शहर पोलीस ठाण्याकडे जात होते.

 

रहेमतनगर येथील मस्जिदजवळ समोर असलेल्या ट्रॅक्टरला ओव्हरटेक करून प्रणील पुढे जाण्यासाठी निघाला. एवढ्यात समोरून दुसरे वाहन आल्याने प्रणीलने ब्रेक मारले. त्यामुळे गाडी घसरून प्रणील हा विरुद्ध दिशेने येणाऱ्या शहर पोलिसांच्या वाहनाच्या मागील चाकात आला. यात डोक्याला गंभीर दुखापत होऊन त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला.

 

दरम्यान, घटनेनंतर घटनास्थळी नागरिकांनी मोठीगर्दी केली. त्यामुळे या मार्गावर काही वेळासाठी वाहतूक विस्कळीत झाली होती. रामनगर पोलिसांना घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक फाल्गून घोडमारे पथकासह घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पाठविला. याप्रकरणी रामनगर पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली. विशेष म्हणजे मृतक प्रणील हा सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षकाचा मुलगा असल्याची माहिती आहे. पुढील तपास रामनगर पोलीस करीत आहे.

RELATED ARTICLES
spot_imgspot_imgspot_imgspot_img
- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular