चंद्रपूर मेडिकल कॉलेज मध्ये गरोदर महिलेचा मृत्यू

News34 chandrapur

चंद्रपूर:- सौ. अर्शिला रूपेश मेश्राम, वय-२३ वर्षे, राह. नवेगाव (वाघाडे) ता. गोंडपिपरी जि. चंद्रपूर येथील गरोदर महिलेला श्वास घेण्यास त्रास होत असल्याने  दि.२३/१०/२०२३ रोजी रात्री १२.०० वाजता च्या दर्म्यान गोंडपिपरी येथील शासकिय रूग्णालय येथे तिच्या पतीने भर्ती करण्यासाठी नेले होते. रूग्णालयातील कर्तव्यावर असलेल्या डॉक्टरांनी सदर महिलेची प्रकृती बिघडत असल्याचे पाहून तीला एका तासात शासकीय जिल्हा वैद्यकीय महाविद्यालय, चंद्रपूर येथे रेफर केले.

 

पहाटे २.३० ते ३.०० वाजताच्या दरम्यान ते वैद्यकिय महाविद्यालय, चंद्रपूर येथे पोहोचले. तसेच तीला प्रस्तुती वार्डात भर्ती करून घेण्यात आले. तेव्हा तिच्यावर उपचार सुरू असतांना दि. २४/१०/२०२३ ला सायं. ७.३० वाजता च्या दरम्यान सदर महिलेचा मृत्यु झाला. प्रसूतीच्या काळात रुग्णालयात संबंधित डॉक्टरांच्या दुर्लक्षीतपणामुळे सदर मातेचा बाळासह मृत्यु झाला असल्याचे परिवारातील सदस्यांचे म्हणने आहे.

 

तेव्हा सदर घटनेचे गाभीर्य लक्षात घेता भाजपा जिल्हाध्यक्ष राहुल पावडे यांना सदर घटनेची दूरध्वनी वरून माहिती मिळताच  तत्काळ पदाधिकाऱ्यांना रुग्णालयात पाठवून घटनेची माहिती घेण्यास सांगितले आणि पावडे यांनी जिल्हा महामंत्री ब्रिजभूषन पाझारे,अनु. जमाती मोर्चा जिल्हाध्यक्ष धनराज कोवे,बंडू गौरकार,साजिद भाई, प्रवीण उराडे,आकाश मस्के,अमित निरंजन यांच्या सोबत जिल्हाधिकारी यांची भेट घेतली व निवेदन दिले.

 

या घटनेची सखोल चौकशी व्हावी व दोषी असलेल्या संबंधीत डॉक्टर व कर्मचारी यांच्यावर तात्काळ कार्यवाही करण्यात यावी तसेच वैद्यकीय महाविद्यालयातील अनेक सोई सुविधा आणि रुग्णांच्या मदती साठी गठित केलेली समिती द्वारे वेळोवेळी केलेल्या सूचनाने अनेक सुविधा होत आहेत. मात्र ह्या घटनेची चौकशी करण्याचे     जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले. आणि अश्या घटनेची पुनरावृत्ती होऊ नये या साठी ठोस उपाय करण्यात यावे अशी विनंती केली आहे. दिलेल्या निवेदनाला जिल्हाधिकारी यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.

Sharing Is Caring:

Leave a Comment

error: Content is protected !!