News34 chandrapur
चंद्रपूर – श्री माता महाकाली महोत्सवा निमित्त तयार करण्यात आलेल्या आला आला हो .. महोत्सव आला या भक्तीगीत सिडीचे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नागपूर येथे विमोचन करण्यात आले. यावेळी श्री महाकाली माता महोत्सव समितीचे अध्यक्ष आमदार किशोर जोरगेवार, समितीचे सचिव अजय जयस्वाल, माजी नगर सेवक बलराम डोडाणी, अशोक मत्ते, मोहित मोदी आदींची उपस्थिती होती.
श्री महाकाली माता महोत्सव समितीच्या वतीने 19 ऑक्टोंबर पासून चंद्रपूरात होऊ घातलेल्या श्री माता महाकाली महोत्सवाची जय्यत तयारी सुरु आहे. यासाठी महाकाली मंदिर पटांगणात भव्य मंडप उभारण्यात आले आहे. सदर महोत्सवाच्या टिझरचे नुकतेच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले आहे. सदर महोत्सवात सुप्रसिध्द कलाकार भक्तीमय गीतांची मेजवानी सादर करणार आहे.
सदर महोत्सवात 9 हजार 999 कन्यांचे पुजन व भोजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तर नवरात्री दरम्यान जन्मास आलेल्या कन्यांना श्री महाकाली माता महोत्सव समितीच्या वतीने चांदीचा सिक्का देण्यात येणार आहे. चंद्रपूरची आराध्य दैवत माता महाकालीची महती राज्यभरात पोहोचावी यातुन येथील पर्यटनाला चालना मिळावी हा या महोत्सवा मागचा मुळ उद्देश असल्याचे समितीचे अध्यक्ष आमदार किशोर जोरगेवार यांनी म्हटले आहे.
सदर महोत्सवासाठी श्री महाकाली माता महोत्सव समितीच्या वतीने माता महाकालीच्या भक्तीमय गीतांची सीडी तयार करण्यात आली आहे. यात बोलो नमोस्तुते महाकाली, आला आला हो महोत्सव आला, दृष्ट पापीओं दूर हटो, मुझे भा गया महाकाली का देश, चंद्रपूरची महाकाली गोंधळाला आली, चला करुया जागर अशी भक्ती गीते सदर सिडीमध्ये असणार आहे. दरम्यान राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नागपूर येथे या भक्तीगीतांच्या गाण्याच्या सिडीचे विमोचन करण्यात आले आहे. सदर गाणी महाकाली भक्तांच्या मुखात बसेल या गाण्यांच्या माध्यमातून माता महाकालीचा जागर राज्यभर होईल असा विश्वास यावेळी श्री महाकाली माता महोत्सव समीतीच्या वतीने व्यक्त करण्यत आला आहे.