Thursday, April 25, 2024
Homeक्रीडानागरिकांचा पाठलाग करणाऱ्या त्या वाघिणीला वनविभागाने केले जेरबंद

नागरिकांचा पाठलाग करणाऱ्या त्या वाघिणीला वनविभागाने केले जेरबंद

वाघिणीने 19 ऑक्टोबर ला महिलेला केले होते ठार

- Advertisement -
- Advertisement -

News34 chandrapur

चंद्रपूर/गडचिरोली – 19 ऑक्टोबर ला शेतात काम करणाऱ्या महिलेला वाघिणीने हल्ला करीत ठार केले होते, त्यांनतर सदर परिसरात वाघिणीचा वावर होता, वनविभागाच्या चमूने वाघिणीला डार्ट करीत जेरबंद केल्याने नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे.

 

19 ऑक्टोम्बरला आरमोरी येथील काळागोटा शेतात 76 वर्षीय ताराबाई धोडरे काम करीत असताना दबा धरून बसलेल्या वाघिणीने ताराबाई वर हल्ला करीत ठार केले.

 

त्या घटनेनंतर परिसरात वाघिणीची दहशत कायम होती, रामाळा-वैरागड या मार्गावर आवागमन करणाऱ्या नागरिकांचा ती वाघीण पाठलाग करीत असल्याच्या अनेक तक्रारी वनविभागाला प्राप्त झाल्या होत्या, त्यामुळे तो मार्गच वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. वनविभाग त्या वाघिणीवर लक्ष ठेवून होता.

 

T13 या वाघिणीमुळे आवागमन करणाऱ्या नागरिकांना सोबत भविष्यात मानव वन्यजीव संघर्षाच्या वाढू नये यासाठी प्रधान मुख्य वनसंरक्षक यांच्या परवानगीने वनविभागाने आरमोरी वनपरिक्षेत्र मुल्लूर चक गावातील झुडपी जंगलात 23 ऑक्टोबर ला डॉ. रविकांत खोब्रागडे, पशुवैद्यकीय अधिकारी, ताडोबा अंधारी व्याघ्रप्रकल्प चंद्रपूर, TATR चे शूटर अजय मराठे व RRT सदस्य यांनी वाघिणीला डार्ट करीत बेशुद्ध करून वाघिणीला जेरबंद केले.

 

जेरबंद करण्यात आलेल्या वाघिणीची वैद्यकीय चाचणी केल्यावर तिला बाळासाहेब ठाकरे, आंतरराष्ट्रीय प्राणी संग्रहालय, गोरेवाडा नागपूर येथे पाठविण्यात आले आहे.

 

सदरची यशस्वी कारवाई वनसंरक्षक रमेशकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली उपवनसंरक्षक धर्मवीर सालविठ्ठल, संदीप भारती, पवनकुमार जोंगा यांच्या उपस्थितीत RRT गडचिरोलीचे दीपक टेम्भूर्णे, योगेश लाकडे, गुरुनानक ढोरे, वसीम शेख, विकास ताजणे, प्रफुल वाडगुरे, निकेश शेंद्र, मनन शेख यांनी केली.

 

 

RELATED ARTICLES

Recent News

Most Popular

error: Content is protected !!