Thursday, December 7, 2023
Homeचंद्रपूरचंद्रपूर जिल्ह्यातील 2 पोलीस अधीक्षकांचा आदेश कागदावरचं

चंद्रपूर जिल्ह्यातील 2 पोलीस अधीक्षकांचा आदेश कागदावरचं

- Advertisement -
- Advertisement -

News34 chandrapur

चंद्रपूर – चंद्रपूर शहरातील रस्त्यावर खासगी बसेसच्या होणाऱ्या अतिक्रमनावर तत्कालीन पोलीस अधीक्षक राजीव जैन व संदीप दिवाण यांनी चाप बसविला होता, मात्र त्यांचा कार्यकाळ समाप्त झाल्यावर तो आदेश फक्त कागदावर राहिला.

शहरातील मुख्य मार्गावर मागील अनेक महिन्यापासून खासगी बसेसचे मोठ्या प्रमाणात अतिक्रमण वाढले आहे, चंद्रपूर – नागपूर मार्गावरील विश्रामगृह, सार्वजनिक बांधकाम विभाग व न्यायाधीशांच्या शासकीय निवासासमोर खासगी बसेसने जबरदस्तीने अतिक्रमण केले आहे.

 

वर्ष 2014 मध्ये पोलीस अधीक्षक राजीव जैन यांनी चंद्रपूर शहरातील सपना टाकीज चौक ते हॉटेल राज ‘समोरून बस स्टॅन्ड, सावरकर चौक मार्गे मुल गडचिरोली कडे जाणाऱ्या व मुल गडचिरोली कडून सावरकर चौक ते प्रीयदर्शनी चौक मार्गे सपना टॉकीज चौक चंद्रपूर येथे प्रवासी घेऊन येणाऱ्या सर्व खाजगी ट्रॅव्हल्स कंपनीच्या प्रवासी बसेस सावरकर चौकाच्या अलीकडे सुरक्षीत खाजगी ठिकाणाहून प्रवासी घेऊन मोटार वाहन अधिनियमांचे काटोकोरपणे पालन करून प्रवासी वाहतुक करतील असा आदेश काढला होता.

 

त्यानंतर प्रियदर्शनी चौक ते वरोरा नाका चौक मार्गे नागपूर कडे जाणाऱ्या व नागपूर रोड कडून प्रवासी घेऊन सावरकर चौक मार्गे येणाऱ्या सर्व खाजगी ट्रॅव्हल्स बस कंपनीच्या प्रवासी बसेस जुना वरोरा नाका चौकाचे अलीकडेच सुरक्षीत खाजगी ठिकाणाहून प्रवासी घेऊन मोटार वाहन अधिनियमाचे कठोर पालन करून प्रवासी वाहतुक करतील.

 

चंद्रपूर शहरातील खाजगी बसेस ट्रॅव्हल्स प्रवासी वाहतुकीस सावरकर चौकाने प्रीयदर्शनी चौक ते जुना वरोरा नाका चौक ह्या परिसरात पुर्णतः प्रवेश बंदी करण्याचा आदेश पारित करण्यात आला होता.

 

मात्र दोन्ही पोलीस अधीक्षकांचा कार्यकाळ समाप्त झाल्यावर त्यांचा आदेश हा कागदावर राहिला, पोलीस अधीक्षकांच्या आदेशाला धुडकवित असंख्य खासगी बसेसने प्रियदर्शिनी चौक ते वरोरा नाका चौक मार्गावर अतिक्रमण केले आहे.

 

विशेष म्हणजे वाहतूक नियंत्रक शाखेसमोरील रस्ता हा खासगी बसचा स्टॅण्ड बनला आहे, अविरत उभ्या असलेल्या या मार्गावरील खासगी बसेसमुळे भविष्यात मोठी दुर्घटना नाकारता येत नाही, दुर्घटना होण्याआधी प्रशासनाने जनतेच्याया जीवाशी खेळू नये अशी मागणी अन्न व औषध प्रशासन व चंद्रपूर जिल्ह्याचे सम्पर्क मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांच्याकडे राष्ट्रवादी कांग्रेसचे महानगर अध्यक्ष राजीव कक्कड यांनी केली आहे.

 

जनतेला त्रास होऊ नये, त्यांची गैरसोय होवू नये व अपघातासारखे प्रकार घडून जिवीत हानी किंवा वित्तहानी होऊ नये तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून ह्या संदर्भात पोलीस, वाहतूक व पटीवाहन या तिन्ही विभागाची जिल्हा अधिकारी कार्यालय बैठक बोलावून मार्गदर्शन करावे. अशी मागणी कक्कड यांनी केली आहे.

 

RELATED ARTICLES
spot_imgspot_imgspot_imgspot_img
- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular