सरकारी नोकरीच्या कंत्राटीकरणाविरोधात चंद्रपुरातील हजारो तरुण रस्त्यावर

News34 chandrapur

चंद्रपूर : 6 ऑक्टोबर 2023 रोजी शिक्षण व नोकरी बचाव समिती जिल्हा चंद्रपूरच्या वतीने सरकारने काढलेल्या खासगीकरण, कंत्राटीकरणाच्या निर्णयाविरोधात नागपूर विभाग शिक्षक मतदार संघाचे आमदार सुधाकर अडबाले यांच्या मार्गदर्शनात धरणे / निदर्शने आंदोलनाचे आयोजन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर करण्यात आले होते. दुपारी तीन वाजता सुरू होणाऱ्या या आंदोलनाला साडेबारा वाजेपासूनच स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे तरुण तथा विविध महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी मोठी गर्दी केलेली दिसून येत होती. हजारो विद्यार्थी दुपारी एक वाजेपासून तर पाच वाजेपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने देत होते.

 

या निर्देशनाच्या दरम्यान स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या अनेक तरुणांनी तथा विद्यार्थ्यांनी कंत्राटीकरणाच्या विरोधातील त्यांचा राग रोष तीव्र शब्दात व्यक्त केला. सरकारने कंत्राटीकरण व शाळांच्या खाजगीकरणाचा घेतलेला निर्णय हा किती अन्यायकारक आहे हे आपल्या मनोगतातून व्यक्त केले.

 

सोबतच या धरणे आंदोलनामध्ये एक नोव्हेंबर 2005 नंतर नोकरीवर लागलेल्या सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन मिळावी, विद्यार्थी हितासाठी वीस पटाखालील शाळा बंद होऊ नये यासाठी समोर शाळा संकल्पना रद्द करावी, राज्यातील विविध कार्यालयात रिक्त असलेली तथा शिक्षक व प्राध्यापकांची पदे तात्काळ करण्यात यावी, शासनाने स्पर्धा परीक्षा शुल्काच्या नावाखाली हजारो रुपयांची सुरू केलेली वसुली तात्काळ थांबून स्पर्धा परीक्षेचे शुल्क 100 रुपये करण्यात यावं तलाठी पदभरती तसेच विविध पदभरती होणाऱ्या पेपर फुटीवर नियंत्रण आणण्यासाठी कायमस्वरूपी कडक असा कायदा करण्यात यावा, इत्यादी मागण्यांना विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगत आतून वाचा फोडली.

 

यावेळी विविध महाविद्यालयातील चंद्रपूर शहरांमध्ये स्पर्धा परीक्षेचे अभ्यास करणारे सर्व विद्यार्थी मोठ्या संख्येने विद्यार्थिनी, सामाजिक क्षेत्रात काम करणारे विविध संघटनेचे पदाधिकारी, जुनी पेन्शन कर्मचारी संघटना, राज्य मध्यवर्ती कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी, जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक संघटना, विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ व इतर विविध शैक्षणिक, राजकीय, सामाजिक क्षेत्रातील कर्मचारी या धरणे आंदोलनाच्या ठिकाणी उपस्थित राहून या आंदोलनाला पाठिंबा दर्शविला.

 

या आंदोलनाची दखल घेऊन शासनाने कंत्राटीकरण व खाजगीकरणाचा निर्णय तात्काळ रद्द न केल्यास येणाऱ्या पंधरा दिवसानंतर एक मोठा आक्रोश मोर्चा विद्यार्थ्यांच्या वतीने आयोजित करण्यात येईल, अशा पद्धतीचा निर्णय या धरणे आंदोलनाच्या दरम्यान घेण्यात आला. या धरणे आंदोलनासाठी स्थापन करण्यात आलेल्या शिक्षण – नोकरी बचाव समिती जिल्हा चंद्रपूरचे सर्व समन्वयक सदस्य ज्येष्ठ मार्गदर्शक उपस्थित होते.

 

सदर मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, अर्थमंत्री तथा शालेय शिक्षण मंत्री यांना पाठविण्यात आले आहे.

Sharing Is Caring:

Leave a Comment

error: Content is protected !!