News34 chandrapur
चंद्रपूर – कोरपणा तालुक्यातील अल्ट्राटेक सिमेंट कंपनी आवरपुर अंतर्गत असलेल्या दत्तक गावातील दहा ग्रामपंचायतीच्या सरपंच उपसरपंच व सदस्य यांनी कंपनी विरोधात 13 नोव्हेंबर रोजी धरणे आंदोलन व बेमुदत साखळी उपोषणाला सुरुवात केली होती. मात्र अजून पर्यंत कंपनीकडून या आंदोलनाची कुठलीही दखल घेण्यात आली नाही त्यामुळे सरपंच संघटनेच्या वतीने 16 नोव्हेंबर पासून आमरण उपोषण पुकारण्यात आलेला आहे.
यावेळी रत्नाकर चटप (ग्रा.प सदस्य नांदा तथा अखिल भारतीय सरपंच संघटना जिल्हा सचिव) व बाळकृष्ण काकडे (उपसरपंच आवरपुर) हे दोघे आमरण उपोषण करीत असून उपोषणाचा आजचा दुसरा दिवस आहे.
कंपनीच्या सी एस आर निधी मधून ग्रामपंचायतींना पाहिजे त्या प्रमाणात निधी उपलब्ध करून देण्यात येत नसल्याचा ठपका ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी ठेवला आहे. सोबतच ग्रामपंचायत प्रशासनाला विश्वासात न घेता निधी परस्पर खर्च केला जात आहे . कंत्राटी कामगारांचया बोनसमध्ये वाढ करावी.
स्थानिक बेरोजगारांना रोजगार द्यावा .कंपनीने माणिकगड येथे होणारी लाईम स्टोनची वाहतूक तात्काळ थांबवावी आय टी आय विद्यार्थ्यांना अप्रेंटिस करता जागा भरती करावी . गाव शिवारातील पांदन रस्त्याची दुरुस्ती कंपनीमार्फत करण्यात यावी . इतर राज्यातील शिक्षित युवकांना आणून कारखान्याच्या माध्यमातून प्रशिक्षित केल्या जाते दत्तक घेतलेल्या गावांमध्ये अनेक युवक सुशिक्षित आहे अशा प्रशिक्षण झालेल्या युवकांना ट्रेनिंग म्हणून घेण्यात यावे, वाढते प्रदूषण बंद करावे दिवसेंदिवस कारखान्याच्या माध्यमातून वाढत्या प्रदूषणामुळे आजूबाजूच्या दत्तक गावामध्ये राहणाऱ्या अनेक नागरिकांना कॅन्सर अपेंडिक्स हर्निया त्वचेचे रोग असे विविध आजार होत असताना दिसत असून अनेकांनी यामध्ये आपले जीव सुद्धा गमावलेले आहे.
कंपनीच्या प्रदूषणामुळे झाल्याचे तज्ञाचे म्हणणे आहे. यावरती कंपनीकडून कोणत्याही प्रकारच्या ठोस उपाययोजना केल्या जात नाही मात्र, परिसरातील नागरिकांच्या जीवाशी कंपनी खेड करीत आहे. ही समस्या त्वरित निकाली काढावी सी एस आर फंड च्या नावाखाली कंपनी इतर जिल्ह्यातील अनेक प्रतिष्ठानंना व अधिकारी लोकांना यातील फंडाचा हिस्सा वाटप करतानाचे चित्रसुद्धा दिसून येत आहे. ते त्वरित बंद करावे इत्यादी मागण्यासाठी सरपंच संघटना आक्रमक पवित्र घेत असून दत्तक गावातील नांदा, बीबी, आवरपूर, हिरापूर, सांगोडा, नोकारी,पालगाव तळोदी, बाखर्डी, भोयेगाव गावातील सरपंच उसरपंच सदस्य अखिल भारतीय सरपंच परिषदेच्या माध्यमातून सदर आंदोलन करीत आहे. या आंदोलनाला दत्तक गावातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आमरण उपोषण आंदोलनाला ओबीसी नेते राजेश बेले यांचा जाहीर पाठिंबा
चंद्रपूर : जिल्ह्यातील आवरपुर येथील अल्ट्राटेक सिमेंट कंपनीच्या दत्तक गावांमध्ये सीएसआर निधी खर्च न करण्याच्या कंपनीच्या धोरणाविरोधात 13 नोव्हेंबर 2023 रोजी एक दिवसीय धरणे आंदोलन व साखळी उपोषण करण्यात आले. या आंदोलनाला ओबीसी नेते राजेश बेले यांनी पाठिंबा दर्शविला.

आवारपुर कंपनीच्या दत्तक गावांमध्ये आवाळपूर, नांदा, बीबी हिरापूर सांगोडा, पालगाव, नोकारी, बाखर्डी, तडोधी, भोयेगाव या गावांचा समावेश आहे. या गावांमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून कंपनी क्षेत्रात कार्यरत आहे. मात्र सन 2020 ते 2023 या सत्रामध्ये कंपनी प्रशासन सदर दत्तक गावांमध्ये सीएसआर निधी खर्च करण्यास जाणीवपूर्वक टाळाटाळ करीत आहे. यामुळे गावातील आरोग्य, पाणी आणि मूलभूत सुविधांचा प्रश्न निर्माण होत आहे. कंपनीच्या प्रदूषण तसेच ओव्हरलोड वाहतुकीमुळे रस्त्याची अवस्था बिकट झालेली असून अपघाताचे प्रमाणही वाढत चाललेले आहे. याबाबत दत्तक गावातील सरपंच, उपसरपंच सदस्य यांनी कंपनी प्रशासनाकडे विविध विकास कामांची मागणी केली.
मात्र कंपनी प्रशासनाने या मागण्या मान्य करण्यास नकार दिला. त्यामुळे संतप्त नागरिकांनी 13 नोव्हेंबर रोजी शिवाजी चौक नांदाफाटा येथे एक दिवसीय धरणे आंदोलन व साखळी उपोषण केले. या आंदोलनाला ओबीसी नेते राजेश बेले यांनी पाठिंबा दर्शविला. त्यांनी मागण्यात आलेली मंजूर करण्याची मागणी प्रशासनाकडे केली आहे.