बाबूपेठवासीयांनो सावधान पुढे वाघ आहे….

News34 chandrapur

चंद्रपूर – 20 नोव्हेम्बरला शहरातील बाबूपेठ भागात शनी मंदिरात पूजेसाठी गेलेल्या मनोहर वाणी या व्यक्तीला वाघाने ठार केल्याने या भागात वनविभागाने गस्त सुरू केली आहे.

 

वर्ष 2023 मध्ये आतापर्यंत तब्बल 21 नागरिकांचा बळी वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात झाला आहे, चंद्रपूर शहरातील बाबूपेठ भाग हा जंगलालगत असून अनेकदा या मानवी वस्तीत वन्यप्राण्याने शिरकाव केला आहे.

 

जुनोना जंगल परिसरात दररोज पहाटे असंख्य नागरिक सकाळी फिरायला जातात मात्र आता त्याठिकाणी वाघाचा वावर वाढल्याने वनविभाग सुद्धा सतर्क झाला आहे.

 

सकाळी फिरायला जाणाऱ्या नागरिकांना वनविभाग सतर्क करीत असून जपून….पुढे वाघ आहे….अशी सूचना देताना दिसंत आहे, जंगल परिसरात वनविभागाने ट्रॅप कॅमेरे लावले आहे, मात्र जंगल भागात मानवी वावर वाढल्याने त्याठिकाणी मोठी घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही, त्याकरिता नागरिकांनी सकाळी फिरायला जाताना बेसावधपणा बाळगू नये.

Sharing Is Caring:

Leave a Comment

error: Content is protected !!