News34 chandrapur
चंद्रपूर – राज्यात सर्वात जास्त वाघांची संख्या असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यात आता मानव-वन्यजीव संघर्षांच्या घटनेत वाढ होत असून सोमवार 20 नोव्हेम्बरला बाबूपेठ भागात वाघाच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू झाला असून यावर्षी आतापर्यंत तब्बल 21 नागरिकांनी वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात आपला जीव गमावला.
बाबूपेठ भागातील जुनोना जंगलातील शनी मंदिरात 53 वर्षीय मनोहर वाणी हे सकाळी पूजा करण्यासाठी गेले होते, त्याचवेळी दबा धरून बसलेल्या वाघाने मनोहर यांच्यावर हल्ला करीत ठार केले.
शनी मंदिर परिसरात तब्बल 300 ते 400 मीटर अंतरावर मनोहर यांचा मृतदेह छिन्नविच्छिन्न अवस्थेत आढळला, घटनेची माहिती मिळताच आम आदमी पक्षाचे युवा जिल्हाध्यक्ष राजू कुडे यांनी घटनास्थळी धाव घेतली.
कुडे यांनी वनविभागाला सदर घटनेची माहिती देत मृतकाच्या कुटुंबाला 25 लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याची मागणी केली, मनोहर हे घरचे कर्ते पुरुष होते, घरची आर्थिक परिस्थिती बिकट असून त्यांना 2 मुली आहे.
वनविभागाशी चर्चा केल्यावर तपास पूर्ण झाल्यावर वनविभागातर्फे आर्थिक मदत देण्याचे आश्वासन कुडे यांना मिळाले.
बाबूपेठ भागातील जंगल परिसरात मागील काही दिवसांपासून 2 वन्यप्राणी नियमित फिरत आहे, ज्यामध्ये बिबट व वाघाचा समावेश आहे, सदर दोन्ही वाघाचा तात्काळ बंदोबस्त करीत या परिसरात 2 पिंजरे वनविभागाने लावावे अशी मागणी करण्यात आली, वाघाचा बंदोबस्त न केल्यास राजू कुडे यांनी वनविभाग विरोधात आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
20 नोव्हेम्बरला घडलेल्या घटनेमुळे सकाळी फिरायला जाणाऱ्या नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले आहे, याठिकाणी दररोज नागरिक मॉर्निंग वॉक करायला जातात.