चंद्रपूर शहरातील अपघातात वाढ, 12 नागरिकांचा बळी

News34 chandrapur

चंद्रपूर – 4 सप्टेंबर पासून सुरू झालेल्या चंद्रपूर शहरातील अपघाताच्या मालिकेत 12 नागरिकांनी आपला जीव गमवावा लागला आहे, मात्र अजूनही हे अपघात कमी करण्यासाठी प्रशासनाने पाऊले उचलली नाही. त्याचा परिणाम आज पायदळ चालणाऱ्या व्यक्तीचा अपघातात मृत्यू झाला.

 

सप्टेंबर महिन्यात नागपूर रोडवर शिक्षिकेचा अपघात, त्याचदिवशी सायंकाळी आदर्श पेट्रोल पंप समोर दुचाकी अपघात, बंगाली कॅम्प चौकाआधी ऑटोच्या धडकेत एकाचा मृत्यू, एकाच दिवशी शहरात 3 नागरिक अपघातात ठार झाले होते.

 

त्यानंतर ऑक्टोबर महिन्यात बाबूपेठ येथे बापलेकाचा मृत्यू, रामसेतू पुलाजवळ 2 युवकांचा मृत्यू, नागपूर रोडवरील विद्या निकेतन शाळेसमोर 2 युवकांचा मृत्यू, नगीनाबाग येथे सेवानिवृत्त पोलीस कर्मचाऱ्यांच्या मुलाचा अपघातात मृत्यू, नोव्हेम्बर महिन्यात वरोरा नाका चौकात युवकाचा अपघातात मृत्यू तर आज 20 नोव्हेम्बरला पायदळ चालणाऱ्या युवकाचा अपघातात मृत्यू झाल्याची घटना घडली.

 

2 महिन्यात तब्बल 12 नागरिकांनी अपघातात आपला जीव गमावला आहे, महामार्गावर होणारे अपघात आता शहरापर्यंत पोहचले आहे, अपघात होण्याची कारणे News34 ने आधीच प्रकाशित केली होती, त्या वृत्तांनंतर चंद्रपूर उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी स्टंट करणाऱ्या दुचाकी चालकांवर कारवाई करीत स्वतःची पाठ थोपटली.

 

शहरातील मार्गावर वाढणारे अतिक्रमण, अतिवेगात दुचाकी वाहन चालविणारे युवक व अल्पवयीन मुले यांच्यावर परिवहन विभाग व वाहतूक विभागाचे लक्ष नाही, त्यामुळेचं शहर अपघातयुक्त बनले आहे.

 

20 नोव्हेम्बरला शहरातील रामनगर पोलीस स्टेशन समोरून छत्तीसगड निवासी 32 वर्षीय टिकम पटेल हे पायदळ जात असताना आंध्रप्रदेश डेपो मधील बस क्रमांक AP01Z0084 ही चंद्रपूर बस स्थानक कडे अतिवेगात जात असताना एसटी बस पटेल हा बसच्या मागील चाकात अडकला, या अपघातात पटेल यांचा जागीच मृत्यू झाला.

रामनगर पोलिसांनी बस चालक 52 वर्षीय स्वामीदास गोदरी ला अटक केली असून पुढील तपास करत आहे.

Sharing Is Caring:

Leave a Comment

error: Content is protected !!