जिलेबी वाटप – बीआरएस च्या आंदोलनाची चंद्रपूर जिल्ह्यात चर्चा

News34 chandrapur

चंद्रपूर – जनतेचे प्रश्न मांडण्यासाठी राजकीय नेते वेगवेगळ्या आंदोलनातून आपली भूमिका ठेवत असतात. अश्याच एका आंदोलनातून बिआरएसने जिल्हाचे लक्ष वेधले आहे. तेलंगणा-महाराष्ट्राला जोडणाऱ्या राज्यमार्गाचे काम मागील पाच वर्षांपासून रखळले आहे. या मार्गावर अपघाताची संख्या वाढली आहे. हा प्रश्न घेत बिआरएसने गांधीगीरी करीत सरकारचे चिमटे काढले.

 

जिल्हात संतनगरी अशी ओळख असलेल्या धाबा गावात बीआरएसने आज ( सोमवार ) राज्यमार्गाचा प्रश्न घेत अनोखे आंदोलन केले.या राज्यमार्गाचे भूमिपूजन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले. आज भूमिपूजनाला पाच वर्ष झालेत मात्र मार्गाचे काम अपूर्ण आहे.या मार्गाने तेलंगणा राज्यातील आणि महाराष्ट्रातील वीस गावातील नागरिक ये जा करतात.मार्गांवर अनेक ठिकाणी गिट्टी पसरविली आहे. अनेक ठिकाणी मार्ग खोदलेला आहे. यामुळे मार्गांवर अनेक अपघात झाले आहे. अनेकांच्या जीव गेला आहे. तर अनेकांना कायमचे अपंगत्व आले आहे.

 

या मार्गाच्या प्रश्न महत्त्वाचा असतानाही लोकप्रतिनिधींनी आवाज उठविला नाही.हा प्रश्न घेत आज बीआरएसने आंदोलन केले.धाबा बसस्थानक चौकात भारत राष्ट्र समितीचे नेते भूषणजी फुसे यांचा नेतृत्वात गांधीगिरी आंदोलन झाले.पाच वर्षाचा कालावधी घेऊन अतिशय उत्कृष्ट मार्ग केला,असा उपहासात्मक टोला करीत फुसे यांनी सरकार,आमदार आणि प्रशासनाचे जिलेबी वाटून चिमटे काढलेत.

 

आंदोलनात मोठ्या संख्येने गोंडपिपरी तालुक्यातील जनता उपस्थित होती. आंदोलनाचे नेतृत्व भूषण भुसे यांनी केले.आंदोलनात राकेश चिलकुरवार, सन्नी रेड्डी, सुरज उपरे, इस्लाम शेख, उमाकांत वाघमारे, सुभाष हजारे, महेंद्र ठाकूर यांनी लोकप्रतिनिधीवर ताशेरे ओढले .गोंडपिपरी तालुक्यातील बीआरएसचे देवानंद डोंगरे, अरुण बोरकर, रमेश बोरकर आंदोलनात उपस्थित होते.

Sharing Is Caring:

Leave a Comment

error: Content is protected !!