News34 chandrapur
चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील युवा नेते महेंद्र ढूमणे यांनी आज आम आदमी पक्षात प्रवेश केला. आम आदमी पक्षाचे जिल्हाध्यक्ष मयूर राईकवार यांच्या नेतृत्वाखाली शंकर सरदार यांच्या उपस्थितीत त्यांनी पक्षात प्रवेश केला.
यावेळी बोलताना महेंद्र ढूमने म्हणाले की, आम आदमी पक्ष हा एकच पक्ष आहे जो खऱ्या अर्थाने जनतेच्या हितासाठी काम करतो. दिल्ली, पंजाब आणि गोवा या राज्यांमध्ये आम आदमी पक्षाने केलेल्या कामांमुळे मी प्रभावित झालो आहे. त्यामुळे मी आम आदमी पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे.
आम आदमी पक्षाचे जिल्हाध्यक्ष मयूर राईकवार म्हणाले की, महेंद्र ढूमणे यांचे आम आदमी पक्षात स्वागत आहे. ते एक अनुभवी आणि कार्यक्षम आहेत. त्यांचा पक्षात प्रवेश आम आदमी पक्षाला अधिक मजबूत करेल.
त्यांच्या सोबत तेजस तिगुटला,वैभव पेचे,निलेश गायकवाड, गौरव पोहाकार,नेहल चिवडे, साहिल हजारे, सुरज मोरे, पवन म्हस्के,भवानी सिवी,संदीप वर्मा,श्री जोशी, मयूर इंगळे,गोलू कनोजिया,भवानी बैस, शुभम इंगळे,मनीष इंगळे,सोनू चिवडे,साईराम बल्की, आशु केमेकर, सुजित वर्मा,सुरज कानोजिया,बबलू मानकर, सन्नी गिल,प्रवीण काळे,कृष्णा तीगुटला,सागर काळे, नंदू झाडे, चेतन पत्रकार, उदय तांड्रा,चिंटू पोगला, मंगेश मुंजेवार,नागेश गायकवाड,कैलाश गायकवाड, दिपक बहुरिया,आकाश भगत,अमित पोटे, अंकुश तडेल, अक्षय सोयाम यांनी प्रवेश केला. या वेळेस आम आदमी पक्षाचे पदाधिकारी सुरज शाह,सुमित हस्तक,नितीन बावणे, गणेश आडे इत्यादी उपस्थित होते.
महेंद्र ढूमणे यांनी चंद्रपूर जिल्ह्यात अनेक युवकांचे संगठन उभे केले आहेत. ते अनेक युवकांच्या हक्कांसाठी लढा देत असतात.