बालरोग तज्ञ संघटना चंद्रपूर शाखेतर्फे विवेक जॉन्सन यांचं अभिनंदन

News34 chandrapur

चंद्रपूर – महाराष्ट्र राज्य बालहक्क संरक्षण आयोग, महिला व बाल विकास विभाग सीसीडीटी आणि युनिसेफ यांच्या संयुक्त विद्यमाने देण्यात येणारा बालस्नेही पुरस्कार 2023 चे मानकरी चंद्रपूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन यांना मुंबई येथील भव्य अशा कार्यक्रमात प्रदान करण्यात आला.

 

महाराष्ट्रातील बालकांचा सर्वांगीण विकास व बालहक्क संरक्षण तसेच त्यांची सुरक्षा, आरोग्य इत्यादी महत्त्वपूर्ण विषयावर अनेक प्रशासकीय यंत्रणा व स्वयंसेवी संस्था सकारात्मक पद्धतीने मुलाचे कार्य पार पाडत आहेत.

 

हे काम यशस्वीरित्या करणाऱ्या अधिकाऱ्यांना बालस्नेही पुरस्काराने सन्मानित करण्यात येतं. यन्दा पुरस्कारासाठी चंद्रपूर जिल्ह्यातील विवेक जॉन्सन यांची उत्कृष्ट मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून निवड करण्यात आली.

त्यांच्या याच कार्याची दखल घेऊन बालरोग तज्ञ संघटना चंद्रपूर शाखा च्या वतीने डॉ अभिलाषा गावतुरे, डॉ वैंकट पंगा तसेच डॉ सीमा शर्मा, डॉक्टर अश्विनी भारत, डॉ सरताज शेख, डॉ देवेंद्र लाडे यांनी स्मृतिचिन्ह देऊन विवेक जॉन्सन यांचे अभिनंदन केले व त्यांच्या पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या. बालरोग तज्ञ संघटना चंद्रपूर नेहमीच आपल्या चांगल्या कामात आपल्या सोबत राहील व सहकार्य करेल अशी ग्वाही सुद्धा डॉ गावतुरे यानीं यावेळी दिली.

Leave a Comment

error: Content is protected !!