Tuesday, February 27, 2024
Homeचंद्रपूर ग्रामीणमूल शहरात पहिले राज्यस्तरीय महिला साहित्य संमेलनाचे आयोजन

मूल शहरात पहिले राज्यस्तरीय महिला साहित्य संमेलनाचे आयोजन

संमेलनाध्यक्ष म्हणून ज्येष्ठ साहित्यिक शशिकलाताई गावतुरे यांची निवड

- Advertisement -
- Advertisement -

News34 chandrapur

मूल – साहित्यिकांना प्रेरणा देत नवसाहित्याची निर्मिती व्हावी म्हणून प्रसिद्ध झाडीबोली साहित्य मंडळ चंद्रपूर व झाडीबोली साहित्य मंडळ शाखा मूल यांच्या विद्यमाने ३ डिसेंबर२०२३ ला बालविकास प्राथमिक शाळा मूल येथे पहिले राज्यस्तरीय महिला झाडीबोली साहित्य संमेलन आयोजित केलेले आहे.

 

या संमेलनाचे संमेलनाध्यक्ष म्हणून ज्येष्ठ साहित्यिक शशिकलाताई गावतुरे यांची निवड करण्यात आली आहे. ज्येष्ठ साहित्यिक शशिकलाताई गावतुरे यांची सावित्री ज्योतीची सावली , बालकाव्य कुंज व क्रांतीपर्व अशी ग्रंथसंपदा असून अनेक लेख व वैचारिक स्फुटलेखन प्रसिध्द आहेत . त्यांच्या साहित्य क्षेत्रातील कार्याबद्दल २००६ ला भाग्यश्री महिला नागरी पतसंस्था यांचा पुरस्कार, २००८ ला अखिल भारतीय सदधर्मसेवा संघ अमरावतीचा मानवता पुरस्कार २०१० ला आदिवासी विकास मंडळाचा समाजसेवा पुरस्कार, २०१८ ला नगर परिषद मूल तर्फे पुरस्कार २०१९ ला योग समितीच्या वतीने जाहीर सत्कार २०१९ ला नक्षत्राचं देणं काव्यमंच पुणेचा राज्यस्तरीय काव्यगौरव पुरस्कार, २०२० ला राष्ट्रसंत विचार साहित्य परिषदेचा रा. ज. बोढेकर साहित्य लेखन पुरस्कार यांसारख्या अनेक पुरस्कारांनी पुरस्कृत करण्यात आले आहे.

 

साहित्य क्षेत्रातील करण्याबरोबरच ज्येष्ठ साहित्यिक शशिकलाताई गावतुरे यांचे सामाजिक कार्य अपूर्व आहे . २००२ पासून त्या बालसंस्कार केंद्र चालवतात . ग्रामगीतेच्या प्रचारासाठी श्री गुरुदेव सेवा मंडळ स्थापन केले. १९९६ पासून निशुल्क वाचनालय , योग प्राणायम वर्ग व शिबिरे चालवतात . शिक्षणाच्या प्रसारासाठी स्वतःचे घर वसतिगृह म्हणून खुले करून दिले . व्यसनमुक्ती व अंधश्रद्धा निर्मूलनासाठी अहोरात्र कार्य करतात.

 

पहिले राज्यस्तरीय महिला झाडीबोली साहित्य संमेलनाचे संमेलनाध्यक्ष म्हणून ज्येष्ठ साहित्यिक शशिकलाताई गावतुरे यांची निवड झाल्याबद्दल स्वागताध्यक्ष प्रा. रत्नमालाताई भोयर, झाडीबोली साहित्य मंडळ चंद्रपूरचे अध्यक्ष अरुण झगडकर, ज्येष्ठ मार्गदर्शक ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर, सचिव लक्ष्मण खोब्रागडे, मूल शाखेचे अध्यक्ष सुखदेव चौथाले, वृंदा पगडपल्लीवार, सुनील बावणे, प्रभा चौथाले, नागेंद्र नेवारे, वर्षा भांडारवार, गणेश मांडवकर, विजय लाडेकर, नामदेव पीजदूरकर, परमानंद जेंगठे, पंडित लोंढे, प्रशांत भंडारे, रामकृष्ण चनकापुरे, सुनील पोटे, सुरेश डांगे, संतोष मेश्राम, मंगला गोंगले यांनी सभेचे आयोजन करून अभिनंदनाचा ठराव घेत पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.

RELATED ARTICLES
spot_imgspot_imgspot_imgspot_img
- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular