News34chandrapur
ब्रह्मपुरी – ब्रह्मपुरी मतदार संघातील सिंदेवाही- लोनवाही व सावली या नगरांचा विकास साधने हेतू राज्याचे विरोधी पक्षनेते तथा ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्र आमदार विजय वडेट्टीवार यांनी राज्य शासनाकडे वेळोवेळी पाठपुरावा करून हातात परिश्रम घेत मागणी रेटून धरल्याने अखेर नगर विकास विभागाच्या वतीने दोन्ही शहरांना प्रत्येकी पाच कोटी असे दहा कोटी रुपये निधी वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत मंजूर करण्यात आली असून विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या प्रयत्नातून सिंदेवाही – लोनवाही व सावली शहरांच्या विकासात भर पडणार आहे.
ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्रात मोडणाऱ्या सावली व सिंदेवाही – लोनवाही या शहरांमध्ये लोक वस्त्यांचे विस्तारीकरण दिवसांगानिक वाढतच असून अनेक प्रभागात विविध विकास कामे प्रलंबित आहेत. या दोन्ही तालुकास्तरावरील शहरांमध्ये पूर्वी ग्रामपंचायत असल्याने अपुऱ्या निधी अभावी विकास कामे होऊ शकली नाही. मात्र शासनाने तालुकास्तरावरील शहरातील ग्रामपंचायतचे रूपांतर नगरपंचायत मध्ये केल्याने नगर विकास विभागाचे विविध योजना मार्फत शहरांना निधी देण्यात येतो.
यापैकीच एक असलेल्या वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत सदर दोन्ही शहराला विकास कामाकरिता निधी प्राप्त व्हावा याकरिता राज्याचे विरोधी पक्ष नेते तथा क्षेत्र आमदार विजय वडेट्टीवार यांनी शासनास वेळोवेळी पाठपुरावा करून विकास निधी मंजूर करण्यास भाग पाडले. याचे फलित म्हणून सावली व सिंदेवाही – लोनवाही या दोन्ही नगरपंचायतींना प्रत्येकी पाच कोटी असे एकूण दहा कोटी रुपयांचा निधी नुकताच मंजूर करण्यात आला असून लवकरच शहरातील विकास कामे सुरू होणार आहेत. मतदारसंघातील नागरिकांच्या अडचणी समस्या जाणून घेत आपल्या विकासाभिमुख शैलीतून क्षेत्र आमदार तथा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी आज पर्यंत शासन स्तरावरून कोट्यावधींचा निधी क्षेत्रासाठी उपलब्ध करून दिला हेही विशेष.