Monday, June 17, 2024
Homeग्रामीण वार्तानागभीड येथील घोडाझरी तलावात मासेमारीसाठी गेलेल्या युवकाचा बुडून मृत्यू

नागभीड येथील घोडाझरी तलावात मासेमारीसाठी गेलेल्या युवकाचा बुडून मृत्यू

आपल्याच जाळ्यात फसला युवक

- Advertisement -
- Advertisement -

News34 chandrapur

प्रशांत गेडाम

नागभीड- नागभीड तालुक्यातील घोडाझरी तलावावर मासेमारीसाठी गेलेल्या एका युवकाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना शनिवारला सांयकाळी ४.30 वाजताच्या सुमारास घडली. प्रमोद अर्जुन नान्हे वय-३० रा. नवानगर (नवखळा) ता.नागभीड असे मृत व्यक्तीचे नाव आहे.

नेहमीप्रमाणे घोडाझरी तलावात चार ते पाच व्यक्ती मासेमारीसाठी सांयकाळी ४ वाजताच्या सुमारास गेले होते. ट्युबवर बसून तलावात मासेमारीसाठी जाळे लावत होते. ते लावत असताना अचानक प्रमोद नान्हे यांचा
तोल जाऊन जाळयात पडला. त्यात त्यांचा बुडून मृत्यू झाला. त्याच्या सहकाऱ्यांनी त्याला बाहेर काढले. या घटनेची माहिती जवळील नागभीड पोलीस स्टेशनला देण्यात आली.

 

लगेच पोलीस घटनास्थळी पोहोचले. घटनेचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी नागभीडच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. घटनेचा पुढील तपास नागभीडचे पोलीस निरीक्षक योगेश घारे करीत आहेत.

RELATED ARTICLES

Recent News

Most Popular

error: Content is protected !!