Friday, June 14, 2024
Homeक्रीडाआक्रमक शिवसेना आमदार भास्कर जाधव यांचा असाही संवेदनशीलपणा

आक्रमक शिवसेना आमदार भास्कर जाधव यांचा असाही संवेदनशीलपणा

चंद्रपुरातील युवासेना कार्यकर्त्यांचा अपघात आणि आमदार जाधव यांची ही भूमिका

- Advertisement -
- Advertisement -

News34 chandrapur

चंद्रपूर – 17 डिसेंम्बर ला चंद्रपुरातील मातोश्री विद्यालयात शिवसेना ठाकरे गटाचा मेळावा आयोजित करण्यात आला होता, या मेळाव्यासाठी पूर्व विदर्भ सम्पर्क प्रमुख आमदार भास्कर जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती.

 

मात्र या मेळाव्यापुर्वी एक दुःखद घटना घडली, मेळाव्याला येताना संजय नगर येथे राहणारा युवासेनेचा कार्यकर्ता 29 वर्षीय रवि निषाद चा अपघात झाला, या अपघातात त्याच्या डोक्याला गंभीर इजा झाली, त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले.

 

18 डिसेंम्बरला ही बाब आमदार भास्कर जाधव यांना कळली असता त्यांनी तात्काळ रुग्णालय गाठत रवि निषाद च्या तब्येतीची विचारपूस केली, त्यावेळी डॉक्टरांना पाचारण करण्यात आले, रवि च्या उपचारात हलगर्जीपणा नको असे सांगत स्वतः रवि ला 25 हजार रुपयांची रोख रक्कम देत मदत केली, पुन्हा काही मदत लागल्यास सांगा व आपली काळजी घ्या असे सांगितले. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख संदीप गिर्हे, युवासेना जिल्हाप्रमुख विक्रांत सहारे व युवासेना विभागीय सचिव निलेश बेलखेडे यांची उपस्थिती होती. रवीला सध्या नागपुरातील रुग्णालयात नेण्यात आले आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातील शिवसेना आमदार जाधव यांनी केलेल्या या कृतीबद्दल त्यांचा कार्यकर्त्यांप्रति असलेला संवेदनशीलपणा पुढे आलेला आहे.
भाषणात आक्रमक असलेल्या या नेत्याने आपल्या कार्यकर्त्यांसाठी दाखविलेला संवेदणशिलपणाची शिवसैनिकात जोरदार चर्चा रंगली होती.

RELATED ARTICLES

Recent News

Most Popular

error: Content is protected !!