Preventive Cardiologist तज्ज्ञ डॉ. सरबेरे यांच्या संशोधनाची जागतिक तज्ञांकडून दखल

News34 chandrapur

चंद्रपूर : येथील Preventive Cardiologist तज्ञ डॉ. लक्ष्मीनारायण सरबेरे यांनी हृदयरोगावर आयुर्वेद उपचार पद्धती सक्षम असल्याचा संशोधनपर अहवाल यांनी सादर केला असून, दुबई येथे आयोजित तिसऱ्या आंतरराष्ट्रीय परिषदेत या संशोधनाची दखल घेतल्याची माहिती त्यांनी स्वत: चंद्रपुरात आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

 

३० नोव्हेंबर ते १ डिसेंबर या कालावधीत दुबई येथे जागतिक हृदय परिषद पार पडली. या परिषदेत डॉ. सरबेरे यांनी सादर केेलेला आयुर्वेदाने हृदयरोग बरा होऊ शकतो आणि विनाशस्त्रक्रिया उच्च गुणवत्तापूर्ण जीवन जगू शकतो, या आशयाचा अहवाल आपण सादर केला होता, असे डॉ. सरबेरे यांनी सांगितले.

 

हा अहवाल संपूर्ण जगातील हृदयरुग्णांना आशेचा किरण दाखविणारा असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. भारतात हृदयरोगाचे वाढते प्रमाण आणि हृदयरोगामुळे होणारे मृत्यू दर रोखण्यासाठी आयुर्वेद उपचार पद्धती अत्यंत उपयोगी सिद्ध होत असल्याचे त्यानी यावेळी सांगितले. पत्रकार परिषदेला माधवबागच्या संचालिका  डॉ. प्रीती सरबेरे यांच्यासह माधवबागचे सामाजिक आरोग्य अधिकारी संजय ठेकाळे उपस्थित होते.

Sharing Is Caring:

Leave a Comment

error: Content is protected !!