एसएनडीटी महिला विद्यापीठ, बल्लारपूर कॅम्पस येथे “सी- प्रोग्रामिंग” या विषयावर व्याख्यान संपन्न

News34 chandrapur

चंद्रपूर/बल्लारपूर – एस. एन. डी. टी. महिला विद्यापीठ मुंबईचे महर्षी कर्वे महिला सक्षमीकरण ज्ञानसंकुल, बल्लारपूर येथे दिनांक ६ डिसेंबर रोजी बीसीए च्या विद्यार्थिनी  करिता “सी- प्रोग्रामिंग” या विषयावर सेमिनार आयोजित करण्यात आला होता. यावेळी ते प्रमुख वक्ता म्हणून बोलत होते. बोलतांना त्यांनी संगणक कौशल्यावर आजच्या विद्यार्थ्यांनी फोकस करावा सोबतच संगणक कौशल्य ही काळाची गरज असल्याचे विषद केले.

यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून बल्लारपूर आवारचे संचालक डॉ. राजेश इंगोले उपस्थित होते. प्रमुख वक्ता म्हणून स्व. डॉ. सचिदानंद मुनगंटीवार रात्रपाळी महाविद्यालय, चंद्रपूर चे प्रभारी प्राचार्य संतोष शिंदे उपस्थित होते. यावेळी समन्वयक वेदानंद अलमस्त आणि संगणक विभागाच्या प्रमुख सहाय्यक प्राध्यापिका नेहा गिरडकर उपस्थित होते.

 

कार्यक्रमाचे प्रास्ताविक समन्वयक वेदानंद अलमस्त यांनी व्यक्त केले,  सोबतच विद्यार्थिनिना संगणक कौशल्य याबाबत महत्व पटवून दिले. प्रमुख वक्ता म्हणून लाभलेले प्राध्यापक संतोष शिंदे यांनी संगणक कौशल्यासोबतच सी –प्रोग्रामिंग याबाबत विद्यार्थिनिना मार्गदर्शन केले. यात त्यांनी सी –प्रोग्रामिंगची गरज आणि आधुनिक काळात होणारे बदल यावर यावर आपले मत व्यक्त केले.

 

कार्यक्रमाचे अध्यक्षीय मनोगत संचालक डॉ. राजेश इंगोले यांनी व्यक्त केले तसेच  भविष्यात संगणक कौशल्य तंत्रज्ञानाचा वापर करून जगात अव्वल राहण्याचे काम कसे करता येईल यावर भर देण्याचे आवाहन सुध्दा केले आणि  भविष्यात असे नव-नवीन उपक्रम वेळोवेळी राबविण्याचे आश्वासन सुध्दा दिले. यावेळी मोठ्या संख्येने विद्यार्थिनी उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहाय्यक प्राध्यापिका शितल बिल्लोरे तसेच आभार प्रदर्शन सहाय्यक प्राध्यापिका नेहा गिरडकर यांनी केले.

Sharing Is Caring:

Leave a Comment

error: Content is protected !!