त्या 3 महिन्याच्या बालिकेसाठी रुग्णवाहिका निःशुल्क

News34 chandrapur

भद्रावती : माणुसकीला धर्म जात नसते आणि सेवेला भिंती नसतात, आलेल्या प्रत्येक रंजल्या गांजलेल्या मदत करणे हाच खरा धर्म समजून शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने रविंद्र शिंदे वरोरा विधानसभा क्षेत्रात काम करीत आहेत. रविंद्र शिंदे यांच्या राजकारणाची दिशा व मार्ग हा प्रचलित नसून वेगळा आहे. त्यांचे राजकारण हे सेवाधर्म व मदतकार्य यास प्राथमिकता देवून सुरू आहे. एक चांगला आदर्श ते त्यांच्या कार्यातून समाजाला देत आहे.

 

अशीच एक घटना नुकतीच पाहायला मिळाली. स्थानिक डोलारा येथील चंडिका वार्ड मधे राहणारी गृहिणी अमरीन इकबाल शेख यांचा तीन महिन्याचा मुलगा मोहत्र हसनैन इकबाल शेख याच्या ह्रुदयात छिद्र आहे. घरची परिस्थिती जेमतेम आहे. उपचाराकरीता पैशांची गरज आहे. मात्र तेव्हढी आर्थिक तयारी कुटुंबाची नाही. अशा परिस्थितीत शिवसेनेकडे अमरीन शेख यांनी पत्र देवून सहकार्याची अपेक्षा केली. परिस्थिती जाणून घेवून तात्काळ रविंद्र शिंदे यांनी बाळाला रुग्णालयात नियमित ने-आण करण्यासाठी रुग्णवाहिकेची व्यवस्था करून दिली. नागपूर येथे बाळावर उपचार सुरू आहे. त्यानुसार आता दररोज त्या बाळाला रुग्णालयात ने-आण करण्याची जवाबदारी शिवसेनेने घेतली आहे.

 

शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) वरोरा विधानसभा प्रमुख रविंद्र शिंदे, स्व. श्रीनिवास शिंदे मेमोरिअल रविंद्र शिंदे चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष प्रा. धनराज आस्वले, ट्रस्टचे कोषाध्यक्ष सुषमा शिंदे तसेच शिवसेना तालुका प्रमुख नंदू पढाल याप्रसंगी उपस्थित होते.

 

चिमुकल्या हसनैन यांचे उपचार होतपावेतो दर महिण्याला निशुल्क रुग्णवाहीका उपलब्ध करुन देण्याचे वचन विधानसभा प्रमुख रविंद्र शिंदे यांनी रूग्णाचा पालकांना यावेळी दिले.

Sharing Is Caring:

Leave a Comment

error: Content is protected !!