पोम्भूर्णा क्रीडा संकुल विविध समस्यांनी ग्रस्त

News34 chandrapur

पोम्भूर्णा – चंद्रपूर जिल्ह्यातील विसापूर येथे राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात आल्या असून त्यासाठी कोट्यवधी रुपयांचा खर्च करण्यात येणार आहे, सोबतच चंद्रपुरातील जिल्हा क्रीडा संकुलासाठी पालकमंत्री मुनगंटीवार यांनी 57 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला मात्र त्यांच्या विधानसभा मतदार संघातील पोम्भूर्णा येथील तालुका क्रीडा संकुल अनेक समस्यांनी ग्रासले आहे, त्या समस्या दूर करा अन्यथाया आंदोलनाचा करणार असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष पवन बंकावार यांनी प्रशासनाला दिला आहे.

 

ग्रामीण भागातील मुले क्रीडा क्षेत्रात निपुण व्हावे यासाठी पोम्भूर्णा येथे क्रीडा संकुलाचे निर्माण करण्यात आले मात्र देखभाली दुर्लक्ष होत असल्याने त्याठिकाणी मोठ्या प्रमाणात मैदानावर येणाऱ्या मुलांना समस्यांचा सामना करावा लागत आहे.

 

मनसे विद्यार्थी सेना अध्यक्ष पवन बंकावार यांनी तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनात क्रीडा संकुल असलेल्या समस्येवर लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे, ज्यामध्ये क्रीडा संकुल सकाळी व सायंकाळी 5 वाजता सुरू करण्यात यावा, लाईट पहाटे 5 वाजता सुरू करण्यात यावे, पूलअप साठी सिंगल बार व डबल बार लावण्यात यावा, रनिंग ट्रक दुरुस्त करावा, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी, एक केअर टेकर ठेवण्यात यावा अश्या विविध मागण्याचे निवेदन मनसे विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष बंकावार यांनी तहसीलदार व तालुका क्रीडा अधिकारी यांना दिले.

 

प्रशासनाने तात्काळ क्रीडा संकुल असलेल्या समस्या सोडवाव्या अन्यथा मनसे विद्यार्थी सेनेतर्फे आंदोलन करण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आला.

निवेदन देतेवेळी पवन बंकावार महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना शहर अध्यक्ष पोंभुर्णा, छत्रपती कस्तुरे, प्रशांत गोंगले, गौरव चंदेल, प्रमोद ढाक, सूरज ढोले, अज्ञान कुरेशी, लोकेश गावरे, स्वप्नील गोरांतवार, रितेश कोटरांगे आदि उपस्थित होते.

Leave a Comment