Friday, June 14, 2024
Homeक्रीडाचंद्रपूर शहरात पुन्हा विद्रुपीकरणाचा प्रकार, मनपाची पोलिसात तक्रार

चंद्रपूर शहरात पुन्हा विद्रुपीकरणाचा प्रकार, मनपाची पोलिसात तक्रार

- Advertisement -
- Advertisement -

News34 chandrapur

चंद्रपूर – शहरात विना परवानगी भिंतीपत्रके लावणाऱ्या एक आशा व्यसनमुक्ती केंद्र आरमोरी व रिद्धी बिल्डर्स विरुद्ध महाराष्ट्र विद्रुपीकरण कायदा १९९५ अंतर्गत चंद्रपूर महानगरपालिका झोन क्र. १ कार्यालयाद्वारे रामनगर पोलीस ठाणे येथे तक्रार दाखल करण्यात आली आहे.

 

शहरातील वरोरा नाका,प्रियदर्शिनी चौक,जिल्हा परिषद समोरील परिसर,जटपुरा गेट तसेच डॉ.आलुरवार हॉस्पीटल परिसरात व्यसनमुक्ती केंद्राची तसेच फ्लॅटची जाहिरात करणारी रिद्धी बिल्डर्सची माहिती असलेली पॉम्पलेट्स व स्टिकर मनपाकडुन पूर्वपरवानगी न घेता लावली असल्याचे सहायक आयुक्त संतोष गर्गेलवार यांना १३ डिसेंबर रोजी पाहणीदरम्यान आढळुन आले.

 

संबंधितास भ्रमणध्वनीद्वारे संपर्क करून पत्रके काढण्यास सांगितले असता अद्याप पावेतो भिंतीपत्रके न काढल्याने एक आशा व्यसनमुक्ती केंद्र व रिद्धी बिल्डर्स यांच्यावर महाराष्ट्र विद्रुपीकरण कायदा १९९५ अंतर्गत कलम ३ नुसार फौजदारी गुन्हा नोंद करण्याची कारवाई करण्यात आली आहे. चंद्रपूर महापालिकेच्या वतीने शासकीय निधीद्वारे शहर सुशोभीकरणाची कामे करण्यात आली आहेत.

 

भिंतीपत्रके,पोस्टर्स,बॅनरबाजीमुळे शहराच्या विद्रुपीकरणासह शहराच्या सौंदर्यात बाधा येते किंबहुना वाहतुकीसही अडथळा निर्माण होत असल्याने याबाबत उच्च न्यायालय आणि राज्य शासनाने आखुन दिलेल्या सुचनांनुसार कारवाई करण्यात येते. त्यानुसार, परवानगीशिवाय पॅम्प्लेट्स, बॅनर्स, होर्डिंग्ज,कापडी फलक लावणा-यांवर आर्थिक दंडासह कायदेशीर कारवाई करण्याची तरतूद या धोरणामध्ये करण्यात आली आहे.

RELATED ARTICLES

Recent News

Most Popular

error: Content is protected !!