News34 chandrapur
(प्रशांत गेडाम)
नागभीड : नागभीड तालुक्यातील तळोधी बा. अंतर्गत येत असलेल्या सावरगाव येथील एका शिक्षकाने १० वर्षीय मुलीची छेडछाड केल्याचा प्रकार समोर आला आहे. पीडितेसह आई-वडिलांच्या तक्रारीवरून त्या शिक्षकाविरुद्ध भादंवि ३५४ अ, भादंवि सहकलम ८,१० पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.
शिक्षकाला गुरूचा दर्जा देण्यात येतो मात्र या नात्याला काळिमा फासणारे काम तळोधी येथील शिक्षकाने केला असल्याचे उघडकीस आले आहे, आरोपी शिक्षकाने 10 वर्षीय विद्यार्थिनींची छेडछाड केली असा आरोप करण्यात आला आहे.
गुन्हा दाखल झाल्यावर शिक्षक हा पसार झाला आहे, पसार शिक्षकाचा शोध पोलिस घेत आहेत. तपास तळोधी बा. ठाणेदार मंगेश भोयर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक भास्कर पिसे करीत आहेत. त्या शिक्षकाला निलंबित करावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.