News34 chandrapur
चंद्रपूर : ओबीसी नेते अशोक जीवतोडे यांनी रविवारी ओबीसी बचाव परिषदेचे आयोजन केले आहे. मात्र, जिल्ह्यातील ओबीसी नेतृत्वामध्ये संभ्रम असून त्यांनी या परिषदेकडे सपशेल पाठ फिरवली आहे. त्यातही अशोक जीवतोडे यांच्या स्वयंघोषित नेतृत्वाबाबत आता सोशल मीडियावर टीका देखील केली जात आहे.
मराठा समाजाला ओबीसीतुन आरक्षण देऊ नये यासाठी रवींद्र टोंगे यांनी आमरण उपोषण केले होते.
यात जिल्ह्यातील सर्व नेतृत्व एकवटले असताना
या आंदोलनाकडे अशोक जिवतोडे यांनी सपशेल पाठ फिरवली होती. मात्र उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमरण उपोषणाला भेट देऊन उपोषणाची सांगता केली. यावेळी आंदोलन यशस्वी होत असल्याचे पाहून अशोक जिवतोडे आंदोलन स्थळी आले. या आंदोलनाची दखल राज्य सरकारने घेतली होती. जिल्ह्यात अनेक ओबीसी लोकप्रतिनिधी आहेत. मात्र अशोक जिवतोडे जिल्ह्याचे एकमेव ओबीसींचे कैवारी असल्याचे बाऊ करत आहेत.
चिमूर येथे आठ दिवस अजित सुकारे आणि अक्षय लांजेवार हे आंदोलन करत होते. मात्र या ओबीसीच्या आंदोलनाला अशोक जिवतोडे यांनी साधी भेट सुद्धा दिली नाही. आता मात्र जिवतोडे स्व केंद्रित ओबीसी बचाव परिषद घेत आहे. त्यामुळे या परिषदेकडे ओबीसी बांधव संशयाने बघत आहेत. अशोक जिवतोडे यांच्या भूमिकेबाबत अनेक ओबीसी नेत्यांनी आता फारकत घ्यायला सुरुवात केली आहे. या परिषदेकडे फारसे कोणी फिरकणार नाहीत केवळ आपल्या हाताखालचे खासगी कार्यकर्ते या दिमतीला राहील अशी शक्यता आहे. जीवतोडे यांनी केवळ स्वतःला मोठे दाखविन्यासाठी हा प्रयत्न केला जात असल्याची चर्चा ओबीसी कार्यकर्त्यांमध्ये आहे.
रवीच पाडतोय अशोकला अंधारात
रवी म्हणजे सूर्याचे काम हे प्रकाश देने आहे. मात्र काही रवी हे अंधारात ठेवण्याचे काम करीत आहे. आपल्या नेतृत्वाला दिशा देण्याचे काम करण्याऐवजी वेगळेच काम सुरू आहे. मात्र दुर्दैवाने नेतृत्वाला देखील आपल्या दिव्याखालचा अंधार दिसून येत नाही आहे. मी सांभाळून घेतो, मॅनेज करतो असे म्हणून हा रवी आपल्याच पोळ्या शेकून घेत आहे. याचा मोठा फटका भविष्यात नेतृत्वाला बसणार आहे.