News34 chandrapur
चंद्रपूर – दुर्गापूर उपक्षेत्र वेकोली परिसरात 7 नोव्हेम्बरला 12 वर्षीय प्रेम वाघमारे या बालकाचा वेकोलीच्या वॉटर प्लांट मध्ये बुडून मृत्यू झाला होता, त्यावेळी पीडित परिवाराला 25 लाख रुपयांचे आर्थिक साहाय्य करू असे लिखित आश्वासन दिले होते मात्र वेकोली तर्फे आज पत्र मिळाले की अशी मदत करण्याचे कसलेही प्रावधान नाही.
याविरोधात उलगुलान संघटनेचे अध्यक्ष राजू झोडे व दुर्गापुरातील नागरिकांनी वेकोली कार्यालयात धडक दिली, वेकोलीच्या वतीने आधीच पोलिसांना बोलाविण्यात आले होते, त्याठिकाणी अनुचित घटना घडून यासाठी पोलिसांचा तगडा बंदोबस्त लावण्यात आला होता.
बराच वेळ झोडे यांनी चर्चा केली मात्र काही तोडगा निघत नसल्याने चंद्रपूर वेकोली क्षेत्राचे मुख्य महाप्रबंधकांनी आम्हला आठवडा भराचा वेळ द्या आम्ही यामध्ये काही तडजोड करीत विशेष बाब म्हणून पीडित परिवाराला आर्थिक मदत करू असे आश्वासन दिले.
झोडे व नागरिकांना आश्वासन मिळाल्यावर आम्ही आठवड्या नंतर पुन्हा येऊ असे सांगितले, जर पीडित परिवाराला मदत मिळाली नाही तर संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल केल्याशिवाय राहणार नाही असा इशारा राजू झोड यांनी दिला.
कामगार संघटनेच्या भूमिकेवर संभ्रम
आजच्या चर्चेत वेकोलीच्या 2 कामगार संघटना सहभागी झाल्या होत्या, मात्र त्यांनी पीडित परिवाराला मदत मिळावी यासाठी कसलेही भाष्य केले नाही, यावर राजू झोडे संतापले व दोन्ही कामगार संघटनांच्या प्रतिनिधींना खडेबोल सुनावले.