शाळा परिसरातील तंबाखू विक्री, सक्त कारवाई करा – जिल्हाधिकारी गौडा

News34 chandrapur

चंद्रपूर – शाळेच्या 100 मीटर परिसरात तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करणाऱ्यांवर सक्त कारवाई करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी दिल्या आहेत. तसेच विक्रीस मनाई करण्यात आलेल्या सुगंधित तंबाखूचा साठा जप्त करून संबंधीतांवर कारवाई करण्यासाठी विशेष मोहिम राबविण्याचे निर्देश आरोग्य विभागाला दिले आहेत.

 

राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत तंबाखू समन्वय समितीची सभा जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली आज घेण्यात आली. याप्रसंगी जिल्हाधिकारी गौडा यांनी वरील आदेश दिले.  जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. महादेव चिंचोळे, पोलिस उपअधिक्षक राधिका फडके, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अशोक कटारे, शिक्षणाधिकारी (प्राथमीक) राजकुमार हीवरे, आरोग्य विभागाच्या जिल्हा सल्लागार डॉ. श्वेता सावलीकर उपस्थित होते.

 

 जिल्हाधिकारी यांनी यावेळी सिगरेट व अन्य तंबाखूजन्य पदार्थ नियंत्रण कायद्यांतर्गत विविध बांबींचा आढावा घेतला. कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईसाठी विशेष मोहिमेंतर्गत पोलिस व शिक्षण विभागाची मदत घेण्याचे त्यांनी सांगितले.

 

यावेळी मनपाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.वनिता गर्गेलवार, डॉ.नयना उत्तरवार, शिक्षण विभाग समग्रचे समन्वयक सुर्यकांत भडके, उपशिक्षणाधिकारी निखीता ठाकरे, अन्न सुरक्षा अधिकारी जी. शी. सातकर, स्थानिक गुन्हे शाखेच्या अपर्णा मानकर व संबंधीत अधिकारी उपस्थित होते.

Sharing Is Caring:

Leave a Comment

error: Content is protected !!