चंद्रपूर पोलिसांना या चोराने दिले आव्हान

News34 chandrapur

चंद्रपूर – चंद्रपूर शहरात मोबाईल हिसकविण्याच्या घटनेत आता दिवसेंदिवस वाढ होत असून कधी चालता बोलता तर कधी वाहनावरून जात असताना मोबाईल हिसकविण्याच्या घटना वाढत आहे, मात्र 10 डिसेंबर ला निवांत बसलेल्या एका व्यक्तीचा मोबाईल हिसकविण्यात आला, या घटनेमुळे चोराने थेट चंद्रपूर पोलिसांना आव्हान केले असे चित्र निर्माण झाले आहे.

 

चंद्रपूर शहरातील मुख्य बस स्थानक समोरील महसूल भवन च्या खाली राकेश गोविंदवार हे रात्री 8 वाजताच्या सुमारास निवांत बसून मोबाईल वर मॅसेज चेक करीत होते, तितक्यात त्यांच्या मागे चेहऱ्याला दुपट्टा बांधलेला व्यक्ती उभा राहिला आणि संधी मिळताच गोविंदवार यांच्या हातातील मोबाईल हिसकावित तिथून पळ काढला, त्याला पकडण्याचा प्रयत्न झाला मात्र चोरांचा वेग जास्त असल्याने तो कुणाच्या हाती लागला नाही.

 

हा संपूर्ण घटनाक्रम सीसीटीव्ही मध्ये कैद झाला आहे, जिल्हा न्यायालय, मुख्य बस स्थानक, जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील गजबजलेल्या महसूल भवन येथे घडलेला हा प्रकार म्हणजे चोराने थेट पोलिसांना आव्हान दिल्यासारखं आहे, नागरिकांनो आपला मोबाईल आता व्यवस्थित सांभाळून ठेवा अन्यथा हा चोर तुमचा मोबाईल हिसकावीत पळ काढणार.

Sharing Is Caring:

Leave a Comment

error: Content is protected !!