Tuesday, May 21, 2024
Homeग्रामीण वार्तादुचाकी वाहनाची झाडाला धडक, 1 ठार 1 गंभीर जखमी

दुचाकी वाहनाची झाडाला धडक, 1 ठार 1 गंभीर जखमी

नातेवाईकांकडे पैसे मागण्यासाठी जात असताना झाला अपघात

- Advertisement -
- Advertisement -

News34 chandrapur

गुरू गुरनुले

मुल – मुल तालुक्यातील मौजा चीचाळा हेटी येथील रहिवाशी असलेले राजू भेंडारे वय(३५) व दशरथ जेंगठे वय(२४) हे दोघे आपल्या दुचाकीने नातेवाईकांकडून पैसे आणण्यासाठी चंद्रपूर कडे जात असताना नागाळा नजिक रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडाला जबर धडक दिल्याने राजू भेंडारे हा जागीच गतप्राण झाला तर सोबत असणारा मित्र दशरथ जेंगठे हा गंभीर जखमी झाल्याने तात्काळ उपचारासाठी चंद्रपूरला हलविण्यात आले.

 

मृतक राजू भेंडारे यांना पत्नी व दोन मुले असून राजू आर्थिक अडचणीत असल्याने पैशाची जुळवाजुळव करण्यासाठी जात होता.

 

मृतक राजुचा व्यवसाय ट्रॅक्टरने रेती दुलाई करणे करीत होता काही दिवसापूर्वी राजूची ट्रॅक्टर महसूल विभागाने पकडल्याने त्याला दंडाची रक्कम भरायची होती म्हणून तो पैशासाठी धावपळ करीत होता. पुढील तपास मुल पोलिस करीत आहे.

RELATED ARTICLES

Recent News

Most Popular

error: Content is protected !!