Friday, March 1, 2024
Homeचंद्रपूर ग्रामीणखेळातून भविष्याचा वेध घ्या - आमदार प्रतिभा धानोरकर

खेळातून भविष्याचा वेध घ्या – आमदार प्रतिभा धानोरकर

अखिल भारतीय कबड्डी स्पर्धेचे थाटात उद्घाटन

- Advertisement -
- Advertisement -

News34 chandrapur

वरोरा – कबड्डी खेळ हा मातीतला खेळ असून शारीरिक विकासासोबतच भविष्याचा वेध घेण्याची ताकद या खेळात असून या खेळाकडे भविष्य घडविण्याच्या दृष्टीने बघितले पाहिजे असे प्रतिपादन आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी केले आहे.

 

 

वरोरा येथे जय हिंद क्रीडा मंडळ द्वारा आयोजित स्वर्गीय बाळूभाऊ धानोरकर यांच्या स्मृती प्रित्यर्थ आयोजित अखिल भारतीय कबड्डी स्पर्धेचा उद्घाटन सोहळा दिनांक 19 जानेवारी 2024 कॉटन मार्केट ग्राउंड वरोरा येथे पार पडला. या प्रसंगी बोलतांना आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी  म्हटले की, प्रो कबड्डी मुळे खेळाडूंना एक नवीन व्यासपीठ मिळाले आहे प्रत्येक खेळातून शारीरिक विकासासोबतच भविष्याचा वेध घेतल्या जाऊ शकते यामुळे भविष्यात व्यसनाच्या आहारी न जाता खेळाकडे वळल्यास आयुष्य सुखकर होऊ शकते.
स्व.खासदार बाळूभाऊ धानोरकर यांनी सुरू केलेल्या या कबड्डी स्पर्धा कधीही खंड पडू न देता पुढेही कशा सुरू राहील या यासाठी मी प्रयत्न करणार असून त्यांनी पाहिलेले स्वप्न पूर्णत्वास नेण्याचा प्रयत्न करणार आहे.
यावेळी मंचावर कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून शिवाजीराव मोघे, प्रमुख अतिथी आमदार सुधाकर अडबाले, माजी आमदार वामनराव कासावार, उप विभागीय अधिकारी शिवनंदा लांगडापुरे, योगेश कौतकर तहसीलदार वरोरा, अनिकेत सोनावणे तहसीलदार भद्रावती, अमोल काचोरे, पोलिस निरीक्षक वरोरा, विपीन इंगळे पोलिस निरीक्षक भद्रावती,सपकाळ साहेब, गट विकास अधिकारी भद्रावती, मुंडकर साहेब गट विकास अधिकारी वरोरा, विलासभाऊ टिपले, मिलींद भोयार, सूर्यकांत खनके संगीताताई अमृतकर, गोपाल अमृतकर,या सोबत असंख्य कार्यकर्ते व पदाधिकारी, व प्रेक्षकांची उपस्थिती होती.
RELATED ARTICLES
spot_imgspot_imgspot_imgspot_img
- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular