आगामी लोकसभा निवडणुकीच्या तयारीला लागले चंद्रपूर जिल्हा प्रशासन

News34 chandrapur

चंद्रपूर – आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन तयारीला लागले आहे, लोकसभा व विधानसभा क्षेत्रातील मतदार यद्यांच्या अद्यावतीकरणासाठी विशेष संक्षिप्त पुनर्निरीक्षण कार्यक्रम राबविण्यात आलेल्या मोहिमेत नव मतदारांचा लक्षणीय टक्का वाढला असल्याची माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी व जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी पत्रकार परिषदेत दिली.

 

27 ऑक्टोबर ते 23 जानेवारी 2024 या कालावधीत पुनर्निरीक्षण कार्यक्रम राबविण्यात आला, यामध्ये चंद्रपूर लोकसभा मतदार क्षेत्रातील (वणी-आर्णी सोडून) एकूण 17 लक्ष 82 हजार 316 मतदार संख्या असून यामध्ये पुरुष मतदार 9 लक्ष 12 हजार 483 तर महिला मतदार 8 लाख 69 हजार 788 व तृतीयपंथी मतदार 45 असे आहे.

 

सदर पुनर्निरीक्षण कार्यक्रम मोहिमेत 18 ते 19 वयोगटातील 15 हजार 27 नव्या मतदारांची भर पडली आहे, तसेच 20 ते 29 वयोगटातील 13 हजार 687 मतदारांची वाढ झाली, 22 हजार 200 मृत मतदारांचे नवे मतदार यादीतून वगळण्यात आले आहे.

 

जिल्ह्यात एकूण 6 हजार 778 दिव्यांग मतदार असून त्यांच्यासाठी सर्व मतदान केंद्रावर रॅम्प ची व्यवस्था करण्यात आली आहे, मतदारांना मतदार यादीत आपले नाव तपासायचे असल्यास त्यांनी HTTPS://electoralsearch.eci.gov.in यावर ऑनलाइन तपासावे असे आवाहन जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी यावेळी केले.

तसेच मतदार सेवा पोर्टल व व्होटर हेल्पलाईन ऐप यावर ऑनलाइन नाव नोंदणीची सुविधा सुद्धा उपलब्ध आहे.

 

चंद्रपुरात एकूण 2 हजार 32 मतदान केंद्रे असून त्यामध्ये शहरी भागात 691 ग्रामीण भागात 1341 मतदान केंद्रे आहे.

Sharing Is Caring:

Leave a Comment

error: Content is protected !!