अखिल भारतीय कबड्डी स्पर्धेचा थाटात समारोप

News34 chandrapur

वरोराः जयहिंद क्रिडा मंडळ, वरोरा द्वारा आयोजित अखिल भारतीय कबड्डी स्पर्धेचा समारोप रविवार दि. 21/01/2024 रोजी कॉटन मार्केट वरोरा येथे पार पडला. या स्पर्धेत पुरुष गटात हरियाणा राज्याचा संघ तर महीला गटात मुंबई येथील संघ अव्वल ठरला.

 

वरोरा येथे पार पडलेल्या अखिल भारतीय कबड्डी स्पर्धेत देशभरातून अनेक संघातून हजेरी लावली होती. चुरशीच्या ठरलेल्या या स्पर्धेत अंतिम सामन्यात साई सोनिपत हरीयाणा या संघाने ठाणे महानगरपालिका, ठाणे या संघावर विजय मिळवला. तर मुर्तीजापूर संघाला पुरुष गटात तृतीय पारितोषिक मिळाले.

 

 

महिला गटात मुंबई महानगरपालिका, मुंबई संघाने एमएच स्पोर्टिंग क्लब, पुणे या संघाचा पराभव करुन अव्वल स्थान प्राप्त केले. तर विदर्भ क्रिडा मंडळ, मोर्शी या संघाला तृतीय पारितोषिक प्राप्त झाले. पुरुष गटात विजेत्या ठरलेल्या साई सोनिपत हरियाणा संघाला एक लाख एक्कावन हजार रुपये रोख व चषक तर उपविजेत्या ठरलेल्या ठाणे महानगरपालिका, ठाणे संघाला एक लाख रुपये रोख व चषक तसेच तृतीय पारितोषिक मिळालेल्या मुर्तीजापूर संघाला एक्कावन हजार रुपये रोख व चषक देऊन गौरविण्यात आले.

 

तसेच महिला गटात विजेता ठरलेल्या मुंबई महानगरपालिका, मुंबई संघाला एक लाख रुपये रोख व चषक तसेच उपविजेत्या ठरलेल्या एमएच स्पोर्टींग क्लब, पुणे संघाला एक्काहत्तर हजार रुपये रोख व चषक तसेच तृतीय विजेत्या ठरलेल्या विदर्भ क्रिडा मंडळ, मोर्शी या संघाला एक्कावन हजार रुपये रोख व चषक देऊन गौरविण्यात आले. या स्पर्धेत चेतन साहू हरियाणा याला उत्कृष्ट खेळाडू म्हणून बुलेट गाडी देण्यात आली.

 

 

तर उत्कृष्ट चढाई बिल्ला(मुर्तीजापूर), उत्कृष्ट जंपर म्हणून आवेद पठाण (ठाणे), उत्कृष्ट पकड म्हणून ढोलू (हरियाणा) यांना वैयक्तीक पारितोषिके देण्यात आली. महिला गटात संजना भोई हिला उत्कृष्ट खेळाडू म्हणून इलेक्ट्रीक स्कुटर देऊन सन्मानीत करण्यात आले. तर पुजा पाटील हिला उत्कृष्ट चढाई, वैष्णवी मेश्राम हिला उत्कृष्ट जंपर तर राखी घानोडे हिला उत्कृष्ट पकड म्हणून सर्वांना पुरस्कार देऊन सन्मानीत करण्यात आले.

 

यावेळी मंचावर आमदार चषकाच्या आयोजिका आमदार प्रतिभाताई धानोरकर या सोबत आ. सुभाष धोटे, आ. किशोर जोरगेवार, माजी मंत्री माणिकराव ठाकरे, यवतमाळ जिल्हा बॅकेचे माजी अध्यक्ष टिकाराम कोंगरे, महिला कॉग्रेस च्या ग्रामीण जिल्हाध्यक्षा नम्रताताई ठेमस्कर, महिला काँग्रेसच्या शहराध्यक्षा चंदाताई वैरागडे, चित्राताई डांगे, अल्पसंख्यांक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सोहेल रजा, विलास टिपले, प्रशांत काळे, मिलिंद भोयर, सुरज गावंडे, प्रशांत भारती, शाकीर मलक, रमजान अली, मदिन कुरेशी, राजू चिकटे, प्रमोद मगरे, बसंत सिंह, मनोज चिंचोलकर यासह काँग्रेस पक्षातील अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. सदर स्पर्धेच्या यशस्वी आयोजनाकरीता जय हिंद क्रिडा मंडळाचे अध्यक्ष प्रविण काकडे, सचिव कासीफ खान व त्यांच्या चमून अथक परिश्रम घेतले.

Sharing Is Caring:

Leave a Comment

error: Content is protected !!