News34 chandrapur
चंद्रपूर – चंद्रपुरातील वेकोली क्षेत्रात नुकतीच भटाळी कोळसा खाणीत एक दुर्घटना घडली होती, त्यात एक कामगार जख्मी झाला होता , मात्र त्या जख्मी कामगाराला उपचाराकरीता रुग्णालयात नेण्याकरिता वेळेवर खाणं परिसरात एम्बुलेंस उपलब्ध नव्हती. यावेळी लगतच्या उपक्षेत्रातुन एका एम्बुलेंसला कॉल करण्यात आला परंतु त्या एम्बुलेंस चालकाला मार्गच माहित नसल्याने रुग्णवाहिका चालकाने घाईत लोखंडी पोल च्या मधून वाहन काढण्याचा प्रयत्न केला असता रुग्णवाहिका पोल मध्ये फसली.
त्यांनतर काही वेळाने दुसऱ्या रुग्णवाहिकेला पाचारण करण्यात आले ,आणि शेवटी त्या जख्मी कामगाराला शहरातील एका खाजगी रुग्णालयात भर्ती करण्यात आले.
मिळालेल्या माहिती नुसार वेकोली चंद्रपुर क्षेत्रात चालणाऱ्या काही रुग्नवाहिका येथील काही डॉक्टर आणि संबंधित विभागाचे लोक खाजगी कामा साठी वापर करतात, त्यामुळे वेळेवर रुग्णांना रुग्णवाहिका मिळत नाही आणि जर कधी अशी एखादी मोठी दुर्घटना झाली आणि रुग्ण वाहिका उपलब्ध नसेल तर त्याला जवाबदार कोण? असा प्रश्न कर्मचाऱ्यांना पडला आहे या समस्येकडे वरीष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे अशी मागणी आता होऊ लागली आहे.