News34 chandrapur
चंद्रपूर – चंद्रपूर श्रमिक पत्रकार संघाच्या आज दि. 17 जानेवारी रोजी पार पडलेल्या आमसभेत 2023-24 या वर्षासाठी नविन कार्यकारिणी निवडणूक पार पडली. यात चंद्रपूर श्रमिक पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी प्रशांत विघ्नेश्वर यांची निवड करण्यात आली.
उपाध्यक्ष योगेश चिंधालोरे, सचिव प्रवीण बतकी, संघटन सचिव बाळू रामटेके, सहसचिव एजाज अली, कोषाध्यक्ष सुरेश वर्मा, कार्यकारिणी सदस्य रोशन वाकडे, प्रशांत देवतळे,प्रकाश देवगडे, सुनिल बोकडे, संदिप पाचभाई यांची निवड करण्यात आली.
निवडणूक अधिकारी म्हणून प्रा. डॉ . योगेश्वर दुधपचारे यांनी काम पाहिले. नवनिर्वाचित कार्यकारिणीचे माजी अध्यक्ष मजहर अली, पंकज मोहरील, कमलेश सातपुते यांच्या सह संघाच्या सदस्यांनी अभिनंदन केले.