हंसराज अहीर यांना अयोध्या येथील प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे निमंत्रण

News34 chandrapur

चंद्रपूर / यवतमाळ – पुण्यभूमी अयोध्या नगरीत दि. 22 जानेवारी 2024 रोजी मर्यादापुरुषोत्तम प्रभु श्रीरामजींच्या मुर्तीची प्राणप्रतिष्ठा होत असून या स्वर्णीम, ऐतिहासीक सोहळ्याच्या निमंत्रणाचा मान मिळाल्याने अतिव आनंद झाला, जीवन कृतार्थ झाले.

 

या भव्यदीव्य प्राणप्रतिष्ठा सोहळ्यामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील तसेच लोकसभा मतदार क्षेत्रातील नागरीकांमध्ये अतिव आनंदाचे व उत्साहाचे वातावरण आहे. मला मिळालेल्या निमंत्रणाबद्दल सर्व संबंधित आदरणीयांचा कायम ऋणी राहील. अशा भावना राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष तथा पुर्व केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी व्यक्त केल्या.

 

सर्व श्रीराम भक्तांनी 22 तारखेला श्रीराम ज्योती प्रज्वलित करून दिपोत्सव साजरा करावा असे आवाहन सुध्दा त्यांनी केले आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!