नवीन वर्षात चंद्रपूर जिल्ह्यातील नायलॉन मांजावर पहिली कारवाई

News34 chandrapur

चंद्रपूर – राज्यात प्रतिबंधित नायलॉन मांजाची विक्री सध्या गपचूप सुरू आहे, तलवारी पेक्षा 10 पट धार असलेला हा मांजा एका क्षणात गळा चिरतो, मकरसंक्रांत आली की हा मांजा विविध ठिकाणी दाखल होतो, सध्या प्रशासनाने दंडात्मक कारवाई व फौजदारी गुन्हा दाखल करण्यासंबंधीच्या सूचना जाहीर केल्या होत्या.

 

नववर्षात नायलॉन मांजावर चंद्रपूर शहरात पहिली कारवाई दुर्गापूर पोलिसांनी केली आहे.

दुर्गापूर पोलिसांना मुखबिरने दिलेल्या माहितीनुसार डीबी पथकाने 6 जानेवारीला साडे अकरा वाजताच्या सुमारास दुर्गापूर येथील समृद्धी पतंजली दुकानावर धाड मारली.

 

या धाडीत प्रतिबंधित नायलॉन मांजा आढळून आला, असून पोलिसांनी 2 चकऱ्या जप्त केल्या आहे, दुकान चालक आरोपी रामचंद्र नंदूरकर यांच्यावर कलम 5, 15 पर्यावरण संरक्षण कायदा 1986, सहकलम 188 भांदवी अनव्ये गुन्हा दाखल करण्यात आला.

 

विशेष म्हणजे दुर्गापुर पोलीस स्टेशनला पहिल्यांदाच महिला पोलीस निरीक्षक म्हणून लता वाढीवे यांची नियुक्ती करण्यात आली, दुर्गापूर पोलीस स्टेशनला रुजू होताच पोलीस निरीक्षक वाढीवे यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील नवीन वर्षातील प्रतिबंधित नायलॉन मांजावर कारवाई केल्याने सर्वत्र त्यांचे अभिनंदन होत आहे.

Leave a Comment