News34 chandrapur
चिमूर – गुणवंत चटपकार
नवीन वर्षाचे औचित्य साधून श्रीहरी बालाजी क्रीडा संकुल व भाजपा युवा मोर्चा चिमूरच्या वतीने चिमूर क्रांती मॅरेथॉन दहा किलोमीटर खुली दौड स्पर्धेचे आयोजन आज दिनांक ७ जानेवारी रोजी सकाळी सात वाजता करण्यात आले होते. या स्पर्धेत १९० स्पर्धकांनी सहभाग घेतला होता.
श्रीहरी बालाजी क्रीडा संकुल व भाजपा युवा मोर्चा चिमूरच्या वतीने आज दिनांक ७ जानेवारी रोजी सकाळी ७ वाजता आमदार कीर्तीकुमार भांगडीया यांनी मॅरेथॉन स्पर्धेला हिरवी झेंडी दाखऊन श्रीहरी बालाजी देवस्थान चिमूर येथील पटानगनातून दौड स्पर्धेला सुरुवात केली. बालाजी मंदिर ते पिंपळनेरी वॉर्ड पाच किलोमीटर व पिंपळनेर वॉर्ड ते बालाजी मंदिर पाच किलोमीटर अशी दहा किलोमीटर खुली दौड स्पर्धेत राज्यासहित विविध राज्यातून १९० सप्रधक सहभागी झाले होते. चिमूर मॅरेथॉन स्पर्धेतील खुल्या दौड स्पर्धेत प्रथम क्रमांक भोपाळ येथील नीरज सोलंकी यांनी प्राप्त केला. आणि रेल्वे क्लबचे नागराज बुरसूने यांनी दुसरा. भोपाळ येथील उपेंद्र पाल यांनी तिसरा. नागपूर येथील राजन यादव यांनी चौथा. तर नाशिक येथील अंकित कुमार यांनी पाचवा क्रमांक प्राप्त केला.
सर्व विजेत्या स्पर्धकांना आमदार कीर्तीकुमार भांगडिया. पोलिस निरीक्षक मनोज गभने. नगर परिषद मुख्याध्यापिका डॉ सुप्रिया राठोड यांचे हस्ते पुरस्कार वितरित करण्यात आले. मॅरेथॉन स्पर्धा यशस्वी करण्यासाठी श्रीहरी बालाजी क्रीडा संकुल व भाजपा युवा मोर्चाच्या पदाधीकऱ्यानी अथक परिश्रम घेतले