बल्लारपूर वनपरिक्षेत्रात वाघाच्या हल्ल्यात एक ठार

News34 chandrapur

रमेश निषाद

बल्लारपूर :- येथून जवळच असलेल्या कारवा जंगलात वाघाने हल्ला करून इसमास ठार केल्याची घटना घडली.
आज ७ जानेवारी ला मध्य चांदा वनविभाग, चंद्रपुर अंतर्गत बल्हारशाह वनपरिक्षेत्रातील नियतक्षेत्र कारवा १ मधील राखीव वनखंड क्रमांक ४९२ मध्ये बल्हारपुर येथील राजेंद्र प्रसाद वार्ड मधील शामराव रामचंद्र तिडसुरवार वय ६३ वर्ष सरपण गोळा करण्यासाठी गेले असता त्यांचेवर वाघ या वन्यप्राण्याने हल्ला करुन जागीच ठार मारल्याबाबत दुपारी १.३० वाजताच्या सुमारास घडली.

 

या बाबत माहिती प्राप्त होताच वनपरिक्षेत्र अधिकारी, बल्हारशाह हे अधिनस्त वनकर्मचारी समवेत तात्काळ घटना स्थळी पोहचले.
घटनास्थळी पाहणी केली असता वाघाचे हल्यात शामराव रामचंद्र तिडसुरबार यांचा मृत्यु झाल्याचे दिसुन आले. त्यावेळी मृत व्यक्तीचे शव ताब्यात घेवुन पोलीस विभागाचे कर्मचारी व मृत व्यक्तीचे नातेवाईक यांचे समक्ष मौका पंचनामा नोंदवुन शव शवविच्छेदना करीता पोलीस विभागाचे ताब्यात देण्यात आले. व मृत व्यक्तीचे नातेवाईकास तात्पुरता आर्थिक मदत पंचवीस हजार रुपये देण्यात आले.

 

सदर प्रकरणात पुढील कार्यवाही मध्य चांदा वनविभाग, चंद्रपुर चे उपवनसंरक्षक, श्रीमती. स्वेता बोड्डु, सहाय्यक वनसंरक्षक आदेशकुमार शेंडगे यांचे मार्गदर्शनात वनपरिक्षेत्र अधिकारी, बल्हारशाह नरेश रामचंद्र भोवरे हे करीत आहेत.

Leave a Comment

error: Content is protected !!