Monday, June 24, 2024
Homeचंद्रपूर शहरकांग्रेसने केली लोकसभा समनव्यक पदांची यादी जाहीर

कांग्रेसने केली लोकसभा समनव्यक पदांची यादी जाहीर

चंद्रपूर लोकसभा समनव्यक पदी डॉ.सतीश चतुर्वेदी यांची नियुक्ती

- Advertisement -
- Advertisement -

News34 chandrapur

चंद्रपूर – लोकसभा निवडणूक अवघ्या 2 ते 3 महिन्यात लागू शकते, त्यामुळे राजकीय पक्षांनी आपली मोर्चेबांधणी सुरू केली आहे.

 

राज्यातील एकमेव कांग्रेस खासदार बाळू धानोरकर यांच्या अवकाळी निधनाने आता कोण? याबाबत अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित झाले मात्र शेवटच्या क्षणी आमदार प्रतिभा धानोरकर या चंद्रपूर लोकसभा निवडणुकीच्या आखाड्यात उभे राहू शकतात.

 

कांग्रेस महासचिव केसी वेणूगोपाल यांनी राज्यातील लोकसभा समनव्यक यांची नियुक्ती जाहिर केली असून चंद्रपूर लोकसभा समनव्यक पदी माजी मंत्री सतीश चतुर्वेदी यांची वर्णी लागली आहे.

 

कांग्रेस पक्षाने अनेक वर्षांनी चंद्रपूर लोकसभा निवडणुकीत विजय मिळविला होता, मात्र आता कांग्रेस पुन्हा निवडून येणार का? चंद्रपूर जिल्ह्याला पहिली महिला खासदार म्हणून आमदार प्रतिभा धानोरकर मिळणार काय? हे चित्र लोकसभा निवडणूक नंतर स्पष्ट होणार.

सध्या चंद्रपूर जिल्ह्यात कांग्रेस पक्षात गटबाजीचा सूर आहे, त्या विविध सुराला सतीश चतुर्वेदी कसे जुळवून घेतात याकडे कांग्रेस कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे.

RELATED ARTICLES

Recent News

Most Popular

error: Content is protected !!