Monday, June 17, 2024
Homeगुन्हेगारीचंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेने प्रतिबंधित नायलॉन मांजा विक्रेत्यांवर केली कारवाई

चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेने प्रतिबंधित नायलॉन मांजा विक्रेत्यांवर केली कारवाई

50 हजार 200 रुपयांचा मुद्देमाल जप्त

- Advertisement -
- Advertisement -

News34 chandrapur

चंद्रपूर – नव वर्षाच्या सुरुवातीला दुर्गापूर पोलिसांनी प्रतिबंधित नायलॉन मांजा विक्रेत्यांवर कारवाई केल्यावर चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेने राजुरा येथे एका मांजा विक्रेत्यांवर कारवाई करीत तब्बल 50 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

 

 

जिल्हा पोलीस अधीक्षक रवींद्र परदेशी यांनी चंद्रपूर जिल्ह्यात प्रतिबंधित नायलॉन मांजा विक्रेत्यांवर कारवाई करण्याचे निर्देश स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक महेश कोंडावार यांना दिले होते.

 

निर्देश मिळाल्यावर पोलीस निरीक्षक कोंडावार यांनी पोलीस उपनिरीक्षक अतुल कावळे यांना प्रतिबंधित मांजा विक्रेत्यांबाबत माहिती काढत कारवाई करावी असे आदेश दिले.

 

अतुल कावळे यांच्या नेतृत्वात स्थानिक गुन्हे शाखेचे पथक नेमण्यात आले, 7 जानेवारीला राजुरा पोलीस स्टेशनच्या हद्दीत असलेले गांधी भवन येथे गायत्री किराणा स्टोर वर धाड मारली, यावेळी दुकानदार 53 राजेश येरावार ताब्यात घेत दुकानाची तपासणी करण्यात आली, यावेळी मोनो काईट कंपनीची नायलॉन मांजा चक्री 26 नग किंमत 20 हजार 800, टूनटून कंपनीचा नायलॉन मांजा चक्री 18 नग किंमत 12 हजार 600 रुपये, गो इंडिया गो कंपनीचा नायलॉन मांजा चक्री 24 नग किंमत 16 हजार 800 रुपये असा एकूण 50 हजार 200 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

 

आरोपी येरावार यांच्यावर कलम 5, 15 पर्यावरण संरक्षण कायदा 1986, सह कलम 188 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास राजुरा पोलीस करीत आहे.

 

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक रविंद्र परदेशी, अप्पर पोलीस अधीक्षक रिना जनबंधु यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक महेश कोंडावार यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक अतुल कावळे, अनुप डांगे, जमिर पठाण, मिलिंद चव्हाण व नितेश महात्मे यांनी केली.

RELATED ARTICLES

Recent News

Most Popular

error: Content is protected !!