News34 chandrapur
गुरू गुरनुले
मुल – शिक्षण प्रसारक मंडळ मुलं संचलित व गोंडवाना विद्यापीठ संलग्नित कर्मवीर महाविद्यालय मूल येथे 10 जानेवारी, 2024 रोजी संयुक्त महाराष्ट्राचे दुसरे मुख्यमंत्री आदरणीय मा. सा. कन्नमवार यांच्या जयंती निमित्य महाविद्यालयाच्या वतीने समाजाच्या उन्नतीचा मार्ग म्हणजे आरक्षण होय ? या विषयावर राज्यस्तरीय वादविवाद स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले होते. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष ऍड. बाबासाहेब वासाडे उपस्थित होते.
उदघाटक म्हणून गोंडवाना विद्यापीठाचे कुलसचिव मान. डॉ. अनिल हिरेखन यांची उपस्थिती होती. प्रमुख पाहुणे म्हणून महात्मा गांधी विज्ञान महाविद्यालय, गडचांदूर चे प्राचार्य डॉ. शैलेंद्र देव उपस्थित होते. सोबतच संस्थेचे सचिव ऍड. अनिल वैरागडे साहेब व सदस्य डॉ. राममोहन बोकारे, महाविद्यालयाचे माजी प्राचार्या कापगते सर वादविवाद स्पर्धेचे परीक्षक मान. प्रा. चंद्रकांत मणियार, प्रा. गोकुळ कामडी, प्रा. कोटगले उपस्थित होते. महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. अनिता वाळके यांनी कार्यक्रमाच्या आयोजनाबाबत ची भूमिका सविस्तरपणे प्रास्ताविक मधून समजाऊन सांगितले.
कार्यक्रमाचे उद्धघाटन कुलसचिव डॉ.अनिल हिरेखन यांनी उद्घाटन भाषणं देतांना आरक्षण म्हणजे सर्वांना सारखी संधी असे विचार व्यक्त केले. व जवलंत विषय निवडून विद्यार्थाना व्यासपीठ निर्माण करून दिल्यामुळे महाविद्यालयाचे अभिनंदन केले. समाजाच्या उन्नतीचा मार्ग म्हणजे आरक्षण होय ? या विषयावर पक्ष व विपक्ष दोन्ही बाजूने स्पर्धकांनी आपले विचार प्रकट केले. पक्ष्याच्या बाजूने सरदार पटेल महाविद्यालयाचा विद्यार्थी प्रलय मशाखेत्री यांनी प्रथम क्रमांक पटकावला व दुसरा क्रमांक डॉ. आंबेडकर महाविद्यालय, चंद्रपूर येथील विद्यार्थी अविनाश रामटेके यांनी प्राप्त केला. विषयाच्या विरुद्ध बाजूने सरदार पटेल महाविद्यालय, चंद्रपूर ची विद्यार्थिनी कू.चांदणी धनकर हिने प्रथम क्रमांक तर द्वितीय क्रमांक माहात्मा गांधी विज्ञान महाविद्यालय, गडचांदूरची विद्यार्थिनी कू.अष्टमी मुंढे हिने पटकावला. सांघिक पारितोषिक सरदार पटेल महाविद्यालयाच्या संघाने पटकावले.
अध्यक्षीय भाषणात ऍड. बाबासाहेब वासाडे यांनी दादासाहेब कन्नमवार यांचा आदर्श आपल्या डोळ्यासमोर समोर ठेवून संस्थेची वाटचाल करावे असे आव्हान केले. कार्यक्रमाचे संचालन सांस्कृतीक विभाग प्रमुख डॉ. जि. एस. आगलावे यांनी केले तर आभार प्रा. सागर मासिरकर यांनी मांडले. कार्यक्रमाच्या सुरवातीस विद्यार्थिनींनी कन्नमवारजी कर्मविरा राजपदींच्या धुरंधरा हे गौरव गीत व उत्कृष्ठ स्वागत गीत सादर करुन उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. कार्यक्रमात अनेक महाविद्यालय स्पर्धकांनी भाग घेतला. कार्यक्रमाच्या पूर्व तयारीसाठी वरिष्ठ,कनिष्ठ महाविद्यायीन प्राध्यापक व विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.