Chandrapur News : चोरीचे चारचाकी वाहन लपविण्याचे नवे ठिकाण

News34 chandrapur

चंद्रपूर – शहरातील चारचाकी वाहन चोरांचा कारनामा ऐकून आपणही काही वेळासाठी चक्रावून जाणार, कारण त्या चोराने ग्रामीण भागातून चारचाकी वाहन चोरी करीत सदर वाहन चंद्रपूर जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या आवारात ठेवले, मात्र स्थानिक गुन्हे शाखेच्या सतर्कतेने त्याचा भांडाफोड झाला. Chandrapur news

 

जिल्ह्यात चोरीच्या गुन्ह्यात छडा अनेक प्रयत्नांनंतर लागतो, असे काही गुन्हे जिल्ह्यात घडले होते मात्र ते उघडकीस न आल्याने पोलीस अधीक्षक परदेशी यांनी त्या गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे सोपविला. Local crime branch

 

24 जानेवारीला गस्तीदरम्यान स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला गोपनीय माहिती मिळाली की एक इसम हा चारचाकी वाहन कमी किमतीमध्ये विकण्याकरिता ग्राहक शोधत आहे, दुचाकीवर फिरत असलेल्या त्या युवकाला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेत विचारपूस केली.

 

26 वर्षीय वैभव डोंगरे, राहणार मोखाडा तालुका सावली असे त्या इसमाचे नाव होते, त्याने व मित्रांनी मिळून चारचाकी वाहन सावली पोलीस स्टेशनच्या हद्दीतून चोरले अशी कबुली दिली व कुणाला त्या वाहनाबाबत थांगपत्ता लागू नये यासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या आवारात वाहन पार्क करून ठेवले.

 

चोरी केलेले वाहन टाटा अल्ट्राज क्रमांक Mh34 BV 1302 स्थानिक गुन्हे शाखेने जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या आवारातून जप्त केले, स्थानिक गुन्हे शाखेने गुन्ह्यात वापरलेली दुचाकी क्रमांक MH14EX 6646 व चारचाकी वाहन असा एकूण 3 लाख 60 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

 

सदरची यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक परदेशी, अप्पर पोलीस अधीक्षक रिना जनबंधु यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक महेश कोंडावार, सपोनि बोबडे, गायकवाड, पोलीस कर्मचारी नितीन साळवे, प्रकाश बलकी, सुभाष गोहोकार, मिलिंद जांभुळे यांनी केली.

Sharing Is Caring:

Leave a Comment

error: Content is protected !!