Monday, February 26, 2024
Homeगुन्हेगारीचंद्रपुरात लाखोंचा मुद्देमाल व मोबाईल नागरिकांना सुपूर्द

चंद्रपुरात लाखोंचा मुद्देमाल व मोबाईल नागरिकांना सुपूर्द

जिल्हा पोलीस अधीक्षक रविंद्र परदेशी यांच्या हस्ते मुद्देमाल सुपूर्द

- Advertisement -
- Advertisement -

News34 chandrapur

चंद्रपूर – चंद्रपुरातील रामनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत मोबाईल चोरी व 2 घरफोडी प्रकरणातील एकूण 13 लाखांचा जप्त मुद्देमाल फिर्यादी यांना पोलीस अधीक्षक परदेशी यांच्या हस्ते वितरित करण्यात आला.

 

जानेवारी 2023 ला महाकाली कॉलरी परिसरातील चंदा वाघाडे व ऑक्टोम्बर 2023 ला जयराज नगर येथील वैभव सिंग यांच्या घरी अज्ञाताने घरफोडी करीत सोन्या-चांदीचे दागिने व रोख असा एकूण 9 लाख 3 हजार रुपयांचा माल लांबविला होता.

 

तसेच वर्ष 2023 मध्ये रामनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीतून मोबाईल मिसिंगच्या अनेक घटना घडल्या होत्या, रामनगर पोलिसांच्या पथकाने सदर मोबाईल मिळावे यासाठी अथक प्रयत्न करीत मोबाईलचा शोध घेत झारखंड, छत्तीसगड, तेलंगणा, मध्यप्रदेश व गुजरात येथून 50 मोबाईलचा शोध लावला.

 

आज 3 जानेवारीला पोलीस अधीक्षक रवींद्र परदेशी यांच्या हस्ते घरफोडी गुन्ह्यातील जप्त मुद्देमाल व मोबाईल फिर्यादी यांना वाटप करण्यात आले.
यावेळी पोलीस उपविभागीय अधिकारी सुधीर नंदनवार, पोलीस निरीक्षक राजेश मुळे, पोलीस निरीक्षक रोशन यादव, सहायक पोलिस निरीक्षक हर्षल एकरे, पोलीस उपनिरीक्षक सामलवार, ठाकरे आदि ची उपस्थिती होती.

RELATED ARTICLES
spot_imgspot_imgspot_imgspot_img
- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular