सुधारित ‘ हिट ॲण्ड रन’ कायद्याविरोधात वाहनचालकांचा चक्काजाम

News34 chandrapur

चंद्रपूर : जडवाहनचालकांसाठी तसेच मोठ्या वाहनचालकांसाठी अन्याय कारक ठरणारा सुधारित हिट ॲण्ड रन कायदा तत्काळ मागे घेण्यात यावा या मागणीसाठी जय संघर्ष वाहन चालक सामाजिक संस्थेच्या वतीने मंगळवार २ जानेवारी रोजी बंगाली कॅम्प चौकात चक्काजाम आंदोलन करण्यात येणार आहे.

 

नुकताच संसदेत जुन्या हिट ॲण्ड रन कायद्यात बदल करून सुधारित कायदा पारीत करण्यात आला. या कायद्यात कठोर तरतुदी करण्यात आल्या असून, वाहनचालकांसाठी अन्यायकारक आहे. यात कारावासाचा कालावधी आणि दंडाच्या रकमेत वाढ करण्यात आली आहे. या कायद्यामुळे वाहनचालकांचे कुटुंब उद्ध्वस्त होणार आहे.अनेकदा अपघात हे आकस्मिक होतात.

 

मात्र, या अपघातात वाहनचालकांनाच जबाबदार धरले जातात. अनेकदा अपघातानंतर वाहनचालकांना गंभीर मारहाणही केली जाते. त्यामुळे अपघातानंतर वाहनचालक जखमीला मदत करण्यापेक्षा पळ काढून पोलीस ठाण्यात आश्रय घेतात. परंतु, नवीन कायदा हा वाहनचालकांसाठी अन्यायकारक ठरणार आहे.त्यामुळे हा कायदा रद्द करण्यात यावा या मागणीसाठी मंगळवार २ जानेवारी बंगाली कॅम्प चौकात चक्काजाम आंदोलन करण्यात येणार आहे. वाहनचालकांनी मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी व्हावे असे आवाहन वाहनचालक संघटनेने केले आहे.

 

पत्रकार परिषदेला विनोद चांदेकर, कॉमे्रड प्रकाश रेड्डी, रवींद्र उमाठे, विजय पवार, नितीन कोलारकर, सचिन वनकर, राजू काळे आदी उपस्थित होते.

New year 2024 ad
अशोक जीवतोडे यांच्याकडून देशवासियांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा..

Sharing Is Caring:

Leave a Comment

error: Content is protected !!