Thursday, June 20, 2024
Homeचंद्रपूर शहरMaharashtra Politics : चंद्रपूर जिल्ह्यातील दिग्गज कांग्रेस नेता भाजपच्या वाटेवर?

Maharashtra Politics : चंद्रपूर जिल्ह्यातील दिग्गज कांग्रेस नेता भाजपच्या वाटेवर?

महायुती मधील आमदाराचा दावा

- Advertisement -
- Advertisement -

News34 chandrapur

चंद्रपूर – कांग्रेसचे माजी मुख्यमंत्री व आमदार अशोक चव्हाण यांनी कांग्रेस सदस्यपदाचा राजीनामा देत राजकीय वर्तुळात खळबळ माजवली, अशोक चव्हाण यांच्या सोबतीला अजून किती नेते जाणार या बाबत अजूनही सस्पेन्स कायम आहे. Maharashtra congress

 

मात्र महायुतीचे नेते व शिंदे गटातील आमदार संतोष बांगर यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील एक दिग्गज कांग्रेस नेता लवकरचं भाजप पक्षात प्रवेश करतील असा खळबळजनक दावा केला आहे. Ashok chavhan resignation

 

आदर्श घोटाळ्यावरून जेलवारी न व्हावी यासाठी चव्हाण यांनी सदर पाऊल उचलले असल्याची चर्चा आहे, चव्हाण यांच्या निर्णयामुळे कांग्रेस पक्षाला मोठा धक्का बसला आहे. Mla santosh bangar

 

हिंगोली येथे प्रसार माध्यमासोबत बोलत असताना आमदार बांगर यांनी भाजप ला लोकसभा निवडणुकीत यश मिळावे यासाठी कोणता नेता निवडणूक जिंकू शकतो यावर भाजपची नजर आहे, येणाऱ्या आठ दिवसात कांग्रेस पक्ष नाहीसा होणार असा दावा यावेळी बांगर यांनी केला आहे.

 

 

चंद्रपूर जिल्हा सहित, लातूर व अमरावती येथील कांग्रेस नेते भाजपच्या वाटेवर आहे व लवकरच ते महायुती मध्ये सामील होणार असा दावा बांगर यांनी केला आहे.

RELATED ARTICLES

Recent News

Most Popular

error: Content is protected !!