Vishwa Hindu Parishad News : जय श्री रामाच्या घोषणा देत चंद्रपुरातील नागरिक अयोध्येला रवाना

News34 chandrapur

चंद्रपूर – अयोध्या येथे 22 जानेवारीला श्रीराम मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली होती, त्यादिवशी देशात दिवाळी सारखे वातावरण तयार झाले होते.

 

अनेक वर्षांनी राम मंदिर निर्माण झाल्याने चंद्रपूर जिल्ह्यातील विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाचे तब्बल 60 कार्यकर्ते आज 11 फेब्रुवारीला दुपारी 4 वाजता अयोध्येला रवाना झाले.

 

 

यामध्ये 40 पुरुष व 20 महिलांचा समावेश आहे, श्री रामाचे दर्शन केल्यावर 2 दिवस अयोध्येला मुक्काम करीत नागरिक परत येणार आहे.

 

यावेळी विश्व हिंदू परिषदेचे माजी प्रांताध्यक्ष रमेश बागला यांनी 35 वर्षांपूर्वीच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला.

 

यावेळी बागला यांनी बस ला झेंडी दाखवीत पुढच्या प्रवासासाठी रवाना केले.

Sharing Is Caring:

Leave a Comment

error: Content is protected !!