Shocking incident in Chandrapur district चंद्रपूर जिल्ह्यातील सावली तालुक्यातील खेडी शिवारात अंगावर शहारे आणणारी घटना घडली आहे, आईने 14 वर्षीय मुलीला विहिरीत ढकलत स्वतः आत्महत्या केली.
6 मार्च रोजी घडलेली ही घटना नागरिकांच्या मनाला चटका लावून गेली आहे, 35 वर्षीय दर्शना दीपक पेटकर, 14 वर्षीय समिक्षा दीपक पेटकर असे मृत आई-मुलीचे नाव आहे. Shocking incident in Chandrapur district
मूल तालुक्यातील दीपक पेटकर यांचं शेत खेडी शिवारात आहे, दुपारी 4.30 वाजताच्या सुमारास आई दर्शना, मुलगी समीक्षा व मुलगा सोहन हे शेतात गेले होते.
पेटकर यांच्या शेताला लागून असलेल्या दुसऱ्याच्या शेतातील विहिरीत दर्शनाने 14 वर्षीय मुलीला ढकलले, त्यानंतर दर्शनाने मुलगा सोहन ला सुद्धा ढकलण्याचा प्रयत्न केला मात्र सोहन ने हात झटकत तिथून पळ काढला.
मुलगा गावात गेल्याने दर्शनाने विहिरीत उडी घेत आत्महत्या केली, गावातील नागरिकांना सोहन ने ही बाब सांगितल्यावर ते तात्काळ शेताकडे आले, मात्र तोपर्यंत दर्शना व समिक्षाचा मृत्यू झाला होता.
गावकऱ्यांनी पोलिसांना याबाबत माहिती दिली, पोलीस घटनास्थळी दाखल झाले त्यांनी दोघांचे मृतदेह बाहेर काढले. व शवविच्छेदन साठी सावली ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले.
मृतक दर्शना ही किडनीच्या आजाराने ग्रस्त होती, काही महिन्यांपूर्वी दर्शना वर शस्त्रक्रिया झाली होती. सध्या यामागील कारण अद्याप कळले नाही, घटनेचा पुढील तपास सावली पोलीस करीत आहे.