Kharra Shortage in Chandrapur District : चंद्रपुर जिल्ह्यात खर्र्याचा शॉर्टेज

Kharra shortage in chandrapur district – चंद्रपूर जिल्ह्यात नवे पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन रुजू होताच त्यांनी अवैध धंद्यावर प्रतिबंध लावण्यास सुरूवात केली आहे.

वर्ष 2012 पासून राज्यात शासनाने सुगंधित तंबाखू प्रतिबंधित केला होता, मात्र त्यानंतर आजही कॅन्सरला निमंत्रण देणारा सुगंधित तंबाखू खुलेआम मिळत आहे. Kharra Shortage in Chandrapur District

सध्या जिल्ह्यात पोलिसांनी सुगंधित तंबाखू विरोधात मोहीम हाती घेतली आहे, त्यामुळे खर्रा शौकिनांचे चांगलेच धाबे दणाणले आहे, एकेकाळी सहज उपलब्ध होणारा खर्रा चंद्रपूर जिल्ह्यात नामशेष होण्याच्या मार्गावर आला आहे.

 

विदर्भात सर्वात जास्त खर्रा शौकीन आहे, सकाळ, दुपार व सायंकाळ या तिन्ही वेळेत नागरिकांच्या तोंडात कॅन्सर सारख्या भयावह आजाराला निमंत्रण देणारा खर्रा असतो, सुगंधित तंबाखू मिक्स करीत हा खर्रा तयार केला जातो, मात्र आता खर्र्यात सुगंधित तंबाखूचे मिश्रण करण्यासाठी पान ठेला धारकांना कमालीची मेहनत करावी लागत आहे.

सध्या पान ठेला धारकांवर कारवाई केल्या जात आहे, मात्र या सुगंधित तंबाखूचे केंद्र असलेलं बल्लारपूर येथील जयसुख वर पोलीस प्रशासनातर्फे ठोस कारवाई केल्या जात नसल्याने अजूनही शंका कुशंका निर्माण होत आहे.

बल्लारपूर नंतर चंद्रपुरातील बिनबा गेट येथील वसीम हा सुद्धा सुगंधित तंबाखू तस्करीचे काम करतो, यावर सुद्धा पोलिसांनी ठोस अशी कारवाई केली नाही, सध्या सुगंधित तंबाखूचा साठा यांच्याकडे जमा जरी असल्यास तो माल पान ठेला धारकांपर्यंत पोहचत नाही आहे. Kharra Shortage in Chandrapur District

पोलिसांच्या धडक कारवाईमुळे पान ठेला धारक आता कमालीचे दहशतीत आले आहे, आमच्यावर कारवाई का करता हे तस्करी करतात त्यांच्यावर कारवाई करा अशी चर्चा आता जिल्ह्यात पान ठेला धारक करीत आहे.

 

पूर्वी 5, नंतर 10 तर आता 30 रुपयांचा 1 खर्रा मिळतो, सुगंधित तंबाखू नसल्याने आता हा खर्रा 50 रुपयांपर्यंत पोहचला आहे, पोलीस अधीक्षकांनी मोठ्या माश्यावर कारवाई केल्यास अनेक अनुत्तरित प्रश्नांचा उलगडा त्या माध्यमातून होणार.

 

कन्फेक्शनरी च्या नावाखाली हे दोन्ही विक्रेते बेधडक जिल्ह्यात सुगंधित तंबाखूची तस्करी करीत आहे, कारण त्यांना राजकीय आश्रय प्राप्त आहे.

सध्या जिल्ह्यातील सर्व पान ठेले हे बंद अवस्थेत आहे.

या तस्करीची गंभीर दखल घेत पोलीस अधीक्षकांनी ठोस पावले उचलावी अशी मागणी नागरिक करीत आहे, नाहीतर काही दिवस हे धंदे बंद करीत पुन्हा सुरू होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Sharing Is Caring:

Leave a Comment

error: Content is protected !!