Thursday, April 25, 2024
Homeगुन्हेगारीAromatic tobacco trade in Chandrapur : शहरातील शामनगर भागात प्रतिबंधित तंबाखूचा व्यापार...

Aromatic tobacco trade in Chandrapur : शहरातील शामनगर भागात प्रतिबंधित तंबाखूचा व्यापार करणारा “मंगल”

- Advertisement -
- Advertisement -

Aromatic tobacco trade in Chandrapur चंद्रपूर पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांच्या आदेशावर जिल्ह्यात अवैध धंद्यावर मुसक्या आवळण्याचे काम पोलीस प्रशासन करताना दिसून येत आहे. 11 मार्चला रामनगर पोलिसांनी 35 हजार 650 रुपयांचा सुगंधित तंबाखू पकडला.

 

शहर व जिल्हाभरात तंबाखू तस्करांना राजकीय आश्रय प्राप्त असल्याने त्यांना हे अवैध धंदे करण्यास मुभा होती मात्र पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांच्यामुळे हे नेटवर्क सध्या विस्कळीत झाले आहे.

 

अशीच एक कारवाई रामनगर पोलिसांनी चंद्रपुरातील अयोध्या चौक, शामनगर येथील किराणा दुकानदार 49 वर्षीय मंगल शिवराम भोयर यांच्या दुकानावर धाड मारली असता पोलिसांना ईगल हुक्का शिशा तंबाखू चे 115 पॉकेट आढळून आले. पोलिसांनी या कारवाईत 35 हजार 650 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. Aromatic tobacco trade in Chandrapur

 

वाचा – तंबाखू तस्कर वसीम च्या साठ्यावर स्थानिक गुन्हे शाखेची धडक

आरोपी मंगल भोयर हा माजी नगरसेविकेचा पती आहे, प्रभागात जनतेला ज्ञान पाजळणारे अवैध धंद्यात उतरून त्यांना कॅन्सर गिरविण्याचे धडे देत आहे हे विशेष. आरोपी मंगल वर अन्न सुरक्षा मानके कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला.

 

सदरची यशस्वी कारवाई पोलीस उपनिरीक्षक मधुकर सामलवार, पोलीस कर्मचारी शेंद्रे, सिडाम, सतीश, रजनीकांत, शरद, मनीषा, लालू, हिरालाल, संदीप व प्रफुल यांनी केली.

RELATED ARTICLES

Recent News

Most Popular

error: Content is protected !!