Chandrapur Lok Sabha BJP Candidate? : चंद्रपूर लोकसभा क्षेत्रातून भाजप उमेदवार म्हणून कुणाचं नाव चर्चेत?

चंद्रपूर – Chandrapur Lok Sabha BJP Candidate? लोकसभा निवडणूक 2024 ची आचारसंहिता कोणत्याही क्षणी देशात लागू शकते, त्याआधी राजकीय पक्षांनी आपली तयारी सुरू केली आहे.

नुकतेच भारतीय जनता पार्टी ने 195 लोकसभा उमेदवारांची नावे जाहीर केली मात्र त्यामध्ये महाराष्ट्र राज्यातील एकाही जागेचा उल्लेख नाही, कारण राज्यातील महायुतीमध्ये जागावाटपाचा तिढा अजून सुटला नाही,  केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे राज्याच्या दौऱ्यावर असून आज याबाबत महत्वाची बैठक आहे, त्यानंतर पुढील 2 दिवसात राज्यातील लोकसभा उमेदवारांची यादी भाजप जाहीर करणार.

सध्या भाजपची संभाव्य यादी समाजमाध्यमावर फिरत आहे त्यामध्ये चंद्रपूर लोकसभेतून पालकमंत्री मुनगंटीवार यांचे नाव आहे.

चंद्रपूर लोकसभेची उमेदवारी भाजप (Chandrapur Lok Sabha BJP Candidate?) कुणाला देणार यावर सध्या संभ्रमाची स्थिती आहे, सध्या राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे, मात्र लोकसभा निवडणूक लढण्याची त्यांनी आपली इच्छा नाही हे जाहीर केले पण पक्षाने आदेश दिल्यास निवडणूक लढू असे वक्तव्य त्यांनी केले होते.
दुसऱ्या बाजूला 2019 च्या लोकसभा निवडणुकीत पराभूत झालेले हंसराज अहिर यांच्याही नावावर भाजप पक्ष श्रेष्ठी विचार करीत आहे.

सध्या अहिर हे मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष आहे, त्यांचा खासदारकीचा अनुभव चांगला आहे, त्यांनी अनेक मोठे घोटाळे उघड करीत UPA सरकारला अडचणीत आणले होते, 2019 मध्ये झालेल्या पराभवात त्यांच्या मतांमध्ये वाढ झाली होती हे विशेष.

 

त्यांनी अनेकदा जाहीर सभेत 2019 च्या निवडणुकीत माझा पराभव झाला नसून तो भाजप पक्षाचा झाला असे त्यांनी व्यक्त केले होते.

सध्या हंसराज अहिर हे चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा क्षेत्रात नित्याने जात आहे, त्यांचा लोकसभा क्षेत्रातील जनसंपर्क दांडगा आहे.
सध्या चंद्रपूर कांग्रेस मधून लोकसभा जागेवर धानोरकर विरुद्ध वडेट्टीवार असे वातावरण आहे, दोघांनीही लोकसभा उमेदवारी पक्ष श्रेष्ठीला मागितली आहे, कांग्रेसच्या गटबाजीचा फायदा भाजपला नक्की होणार.

 

भाजप पक्षातर्फे जिल्ह्यातील दोन्ही नेत्यांनी उमेदवारीसाठी फिल्डिंग लावली आहे, मात्र दोघांच्या भांडणात तिसऱ्याची एंट्री होणार ही शक्यता सुद्धा नाकारता येत नाही.
कारण भाजप ला लोकसभा निवडणुकीत आता विजय हवा, पक्षांतर्गत कलह ते सहन करणार नाही.

यासाठी बाहेरून एक उमेदवार चंद्रपूर भाजपतर्फे लोकसभा निवडणूक लढवु शकतो, त्याबाबत त्या नेत्याने तयारी सुद्धा दर्शविली आहे.

 

येणाऱ्या काळात कांग्रेस व भाजप पक्षातील अंतर्गत कलह लोकसभा निवडणुकीच्या माध्यमातून नागरिकांना दिसणारचं.
जर भाजपने चंद्रपुरातील स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्त्याला उमेदवारी घोषित केली तर पराभव अटळ आहे.

विशेष म्हणजे दोघात तिसरा आता सर्व विसरा यासाठी सुद्धा चंद्रपुरातील भाजपच्या दिग्गज नेत्यांनी तयार रहावे. कारण 2009 च्या विधानसभा निवडणुकीत दोघांच्या भांडणात नागपुरच्या नाना श्यामकुळे यांना भाजप पक्षाने चंद्रपूर विधानसभेची उमेदवारी दिली होती, आता लोकसभा निवडणुकी पूर्वी काय उलथापालथ होणार हे येणारी वेळचं सांगेल.

Sharing Is Caring:

Leave a Comment

error: Content is protected !!