Chandrapur lok sabha congress candidate : चंद्रपूर लोकसभेला कांग्रेस पक्षाकडून हा उमेदवार हवा

Chandrapur lok sabha congress candidate आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी आपली मोर्चेबांधणी सुरू केली आहे, मात्र चंद्रपुरात अद्यापही उमेदवारीचा घोळ कायम आहे.

 

भाजप सहित कांग्रेस पक्षात संभ्रमाची स्थिती निर्माण झाली आहे, लोकसभेसाठी प्रतिभा धानोरकर यांच्या नावावर जवळपास शिक्का मोर्तब झाल्यावर अचानक विजय वडेट्टीवार यांच्या कन्या शिवानी वडेट्टीवार यांनी चंद्रपूर लोकसभेवर दावा केला आहे. Chandrapur lok sabha congress candidate

 

 

शिवानी वडेट्टीवार यांच्या दाव्यामुळे कांग्रेस पक्ष व घटकपक्षात संभ्रमाची स्थिती आहे.
विशेष म्हणजे शिवानी वडेट्टीवार यांनी सरळ दिल्ली गाठत पक्षातील वरिष्ठांना लोकसभा उमेदवारीसाठी विनंती केली आहे.

 

तर दुसरीकडे 11 मार्च ला चंद्रपुरातील शासकीय विश्रामगृहात इंडिया आघाडीतील घटक पक्षाने शिवानी वडेट्टीवार यांच्या उमेदवारीला विरोध दर्शविला आहे.

 

आज झालेल्या बैठकीत कांग्रेस, राष्ट्रवादी कांग्रेस शरद पवार गट, शिवसेना उबाठा गट, आम आदमी पार्टी, संभाजी ब्रिगेड व समाजवादी पक्षाने संयुक्त बैठक घेत ठरविले की चंद्रपूर लोकसभा ही कांग्रेस पक्षाच्या कोट्यात आहे, त्यामुळे पक्षाने लवकरात लवकर आपला उमेदवार जाहीर करावा. Chandrapur lok sabha congress candidate

 

उमेदवार कसा जिंकणार त्यासाठी आम्ही सर्व पक्ष मिळून कामाला लागू मात्र सध्या कांग्रेसमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. याकरिता पक्षाने चंद्रपूर लोकसभा क्षेत्रातील उमेदवार द्यावा अश्या मागणीचे पत्र महाविकास आघाडीतील प्रमुख नेत्यांना पाठविणार असल्याचे बैठकीत एकमत झाले.

 

राज्याचे विरोधीपक्ष नेते विजय वडेट्टीवार यांच्या कन्या शिवानी वडेट्टीवार यांनी चंद्रपूर लोकसभेवर दावा केल्याने पक्षातील अंतर्गत कलह पुढे आला आहे, पुन्हा धानोरकर विरुद्ध वडेट्टीवार असा संघर्ष पक्षात सुरू झाला आहे.

शिवानी वडेट्टीवार या गडचिरोली लोकसभा क्षेत्रात येतात, त्यामुळे इंडिया आघाडीतील घटक पक्षाने चंद्रपूर लोकसभा क्षेत्रातील उमेदवारांची मागणी केली आहे. एकंदरीत हा शिवानी वडेट्टीवार यांच्या उमेदवारीला विरोध आहे.

वाचा – भाजपच्या यादीत हंसराज अहिर यांचे नाव झळकले

महाविकास आघाडीमधील पक्षांनी लोकसभा निवडणुकीसाठी तयारी सुरू केली असून लवकरचं सर्व घटक पक्षाचा कार्यकर्ता मेळावा आयोजित करणार असल्याची माहिती या बैठकीत दिली.

 

आयोजित बैठकीत राष्ट्रवादी कांग्रेस शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र वैद्य, महानगर अध्यक्ष दीपक जयस्वाल, कांग्रेसचे महानगरअध्यक्ष रामू तिवारी, शिवसेना उबाठा गटाचे जिल्हाप्रमुख संदीप गिर्हे, आप चे नेते सुनील मुसळे, मयूर राईकवार आप जिल्हाध्यक्ष, समाजवादी पक्षाचे सोहेल खान, संभाजी ब्रिगेडचे खैरे सर यांची उपस्थिती होती.

Sharing Is Caring:

Leave a Comment

error: Content is protected !!